कोई हमसे जीत न पावे.. चले चलो

राजश्री सतीश शिरोडकर

आयुष्यावर बोलू काही …..

परवाच एक सुंदर वाक्य वाचण्यात आलं….
“कुछ लोग पैर होते हुए भी जिंदगी की रेस मे दौड नहीं पाते हैं,
लेकिन कुछ लोग तो पैर ना होते हुए भी आसमान में उड जाते हैं”

हे वाक्य मला प्रचंड आवडलं. हे जीवन म्हणजे खरंतर एक शर्यतच आहे. एक प्रकारची मॅरेथॉन रेसच म्हणा..!! या शर्यतीला अंत नाही. या शर्यतीत भाग घ्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. ज्याची त्याची क्षमता आणि ज्याची त्याची धावपळ..!!! मला “ससा” व्हायचा की मला “कासव” व्हायचं हे आय डोन्ट नो… पण देवाने मला दोन छान पाय दिलेत, त्या पायात शक्ती दिली आहे चालण्याची.. धावण्याची..!!! तर मग मी का नाही त्यात भाग घ्यायचा..?

भाग तर घ्यायलाच हवा…. क्योंकि आपको आपके जिंदगी की….
“गाडी बुला रही है
सिटी बजा रही है
चलना ही जिंदगी है
चलती ही जा रही है”

अर्थात आता मी जे बोलतेय ती शारीरिक शक्ती झाली. मानसिक शक्तीचे काय ? मानसिक क्षमता नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. जे काही आपल्याला करायचं ते आतून आलं पाहिजे आणि आतून आलं किंवा जर तुमच्या अंतरात्म्याने तुम्हांला सांगितलं तर आणि तरच तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.. मग तुम्हाला पाय असोत किंवा नसोत.

आणि मग अशावेळी विचार करताना मला प्रचंड आवडलेल्या “लगान” या चित्रपटातील हे गाणं आठवायला लागतं….
“बार बार हाँ, बोलो यार हाँ अपनी जीत हो, उनकी हार हाँ
हे बार बार हाँ, बोलो यार हाँ अपनी जीत हो, उनकी हार हाँ
कोई हम से जीत ना पावे चले चलो, चले चलो
मिट जावे जो टकरावे, चले चलो
भले घोर अंधेरा छावे चले चलो, चले चलो
कोई राह में ना थम जावे, चले चलो”

मी माझ्या महाविद्यालयीन काळात भरपूर चित्रपट पाहिले (अगदी लेक्चर्स बंक करून.. आणि हो, हाइट म्हणजे परीक्षा सुरू असताना देखील). पण लग्नानंतर मात्र अगदी मोजके चित्रपट बघितले जसे की परिणीता (नवीन), १९४२ ए लव्ह स्टोरी, टायटॅनिक, लगान. त्यातला “लगान” मला खूप आवडला होता. चिकाटी, जिद्द असावी तर ती तशी… जस्ट लाईक अमीर खान…!!

Nothing is impossible. Your hard working makes everything possible.

एखादी क्षमता नसेल तर ती आपण जिद्दीने आत्मसात करू शकतो. एकबार ठानकर तो देखिए जनाब…हम कुछ भी कर सकते हैं..!! हम किसी से कम नहीं…सही ना? एका मोठ्या लांबलचक प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलानेच होत असते ना हो..!!! मग कशालाही न घाबरता थेट सुरूवात करायची.

“ऐसा डर के कब तक चलेगा
अगर लाइफ में कुछ
अलग करना है,
तो इस डर की
विकेट तो गिरानी ही पड़ेगी..!!
तू तेरे नस नस से
भगा दे डर,
कुछ अलग कर”

©️ राजश्री सतीश शिरोडकर, कोल्हापूर
26.01.2024

राजश्री सतीश शिरोडकर, कोल्हापूर या लेखिका,
मोटिव्हेटर, अनुवादिका आणि ट्रेनर आहेत.
त्यांनी बरीच वर्षे मानसशास्त्र व इतिहास या
विषयांची प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.

वाचण्यासारखं आणखी काही ..

कोणत्या रेसमध्ये आपण मुलांना अडकवतोय….!

Cat & Dog : जीवन कसं जगावं…..

बोलो जी बोलो ये राज खोलो

अनबिलिव्हेबल दिशा….. (मनोरंजक मराठी कथा)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English

One thought on “कोई हमसे जीत न पावे.. चले चलो

  1. जिवना हे संघर्ष आहे … अपयश आणि यश ह्या नाण्याच्या दोन्ही बाजु ज्याला समजला तो कधीही जिवनात पाठीमागे वळुन पाहात नाही , तो कायम प्रगतीच्या मार्गावरच राहतो,
    किती खाचखळगे आले तरी सामर्थ्याने तोंड देतो .. so called Life is race.. too good post Rajashri Madam …. 👌💐👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *