Funny वधूपिता ………

महावीर सांगलीकर


एक गृहस्थ मला म्हणाले,
‘आमच्या पोरीला एखादं स्थळ बघा की!’
‘बायोडाटा आणलाय का?’ मी विचारलं.
‘नाही’
‘बरं…. वय किती आहे तिचं?’
‘आसंल एक पंचवीस-सव्वीस वर्षं’
‘पंचवीस की सव्वीस?’
‘तिला विचारून सांगतो’
‘बरं, उंची किती आहे तिची ?’
‘तिची ना……? आसंल पाच-सव्वा पाच फुट ’
‘अवघड आहे…. शिक्षण किती झालंय?’
‘माझं बारावीपर्यंत झालंय की’
‘अहो तुमचं शिक्षण घेऊन काय करायचं? पोरीचं शिक्षण किती झालंय?’
‘ती बरीच शिकलीया’
‘बरीच म्हणजे किती?’
‘तिला विचारायला पाहिजे’
‘परत अवघड आहे….. बरं, काय अपेक्षा आहेत तुमच्या?’
‘मुलगा पुण्या-मुंबईचा पाहिजे. गव्हर्मेंट सर्विस पाहिजे. पगार भरपूर पाहिजे, आणि शेती पण असावी दोन चार एकर’
‘आणखी?’
‘आणखी घर असावं स्वत:चं’
‘बरं…. इंटरकास्ट स्थळ चालेल का?’
‘पोरीला चालंल, पण मला अजिबात नाय चालणार!’
‘बरं, असं एक स्थळ आहे माझ्याकडं, तुमच्या जातीचं. मुलगा सरकारी नोकरीत आहे, ऐंशी हजार रुपये पगार आहे आणि मुलाची दहा एकर शेती आहे पुण्यात शनिवार वाड्याजवळ जवळ. पण त्याच्या कांही अटी आहेत’
‘काय?’
‘मुलीनं शेती सांभाळायला पाहिजे. तिला ट्रॅक्टर चालवता यायला पाहिजे, शेतातली सगळी काम करता यायला पाहिजेत. आणि तिनं शेतातल्या घरातच राहायला पाहिजे……शिवाय सध्या शेतमजूर मिळत नाहीत, त्यामुळं तुम्ही स्वतः आणि तिच्या भावाने पण त्या शेतात काम करायला यायला पाहिजे गरज पडेल तेंव्हा. आहे का तयारी तुमची आणि तिची?’


त्या गृहस्थाचे तोंड पाहण्यासारखे झाले!

माझ्या लग्नाची गोष्ट…जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..
दिगंबर–श्वेतांबर विवाह : काळाची गरजदिनकरचं लग्न
लघुकथा: गौरीचं लग्नCat & Dog : जीवन कसं जगावं…..
Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!मैं तुमसे प्यार नहीं करती ……

Jains & Jainism (Online Jain Magazine)

They Won Hindi (हिंदी कहानियां व लेख)

TheyWon
English Short Stories & Articles

न्यूमरॉलॉजी हिंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *