google.com, pub-2195048932716931, DIRECT, f08c47fec0942fa0

तुमच्या मुलांना इंग्लिश मेडीयममध्येच शिकवा!

-महावीर सांगलीकर


इंग्लिश मेडीयम

तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे त्यांच्या अजिबात हिताचे नाही. तुम्ही त्यांना इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळेतच शिकायला पाठवायला पाहिजे.

हा लेख तुम्हाला तुमच्या मुलांचे खरेच हीत साधायचे आहे, त्यांच्यासाठी आहे. जे पालक भंकस अस्मितावादाला बळी पडलेले आहेत, त्यांनी हा लेख ना वाचलेला बरा.

माझे हे म्हणणे तुमच्यापैकी अनेकांना खटकेल, पण मराठी भाषेच्या नावावर राजकरण करणार्‍यांची (मग ते मुंबईकर असोत की पुणेकर) मुले मराठी शाळेत शिकत नसतात हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे.

पुण्यातील असाच एक मराठीप्रेमी महाभाग इंग्रजी भाषेच्या विरोधात प्रचार करत असतो, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवणारे पालक मूर्ख असतात असे तो म्हणतो, पण त्याची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकत आहेत. कहर म्हणजे हा महाभाग इंग्रजी माध्यमाचे क्लासेस घेत असतो!

तेंव्हा अशा ढोंगी मराठीप्रेमींचे ऐकुन आपल्या मुलांना मराठी शाळेत घालायच्या फंदात तुम्ही अजिबात पडू नका!

इंग्लिश मेडीयम | इंग्रजी माध्यमाचे फायदे आणि मराठी माध्यमाचे तोटे

मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकण्याचे अनेक फायदे आणि मराठी माध्यमातून शिकण्याचे अनेक तोटे होतात. जसे:

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वातावरण कॉस्मोपॉलीटन असते. तेथे वेगवेगळ्या धर्माचे व वेगेवेगळ्या भाषिक समूहातील विद्यार्थी असतात. त्यांच्याशी मैत्री झाल्याने प्रत्येकाला वेगवेगळ्या लोकसमूहांची जवळून ओळख होते. त्याचा फायदा विद्यार्थ्याच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी होत असतो. याउलट मराठी शाळेतील बहुतेक विद्यार्थी मराठी भाषिक असतात. त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास एका विशिष्ट दिशेनेच होतो.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक-शिक्षिका या देखील कॉस्मोपॉलीटन असतात. त्याचाही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी चांगलाच फायदा होतो. जसे, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा उत्तमपणे बोलता येतात. हे विद्यार्थी बहुभाषिक बनतात, हा त्यांचा मोठाच फायदा होय. याउलट मराठी माध्यमाच्या शाळेतील बहुतेक विद्यार्थ्यांना मराठीशिवाय इतर भाषा नीट बोलता येत नाहीत. तेथील शिक्षक-शिक्षिका एकाच मुशीतल्या असल्याने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासही विशिष्ट दिशेनेच होतो.

इंग्लिश मेडीयम

इंग्रजी भाषेचा एक मोठा फायदा म्हणजे या भाषेत कमी शब्दात नेमके लिहिता व बोलता येते. याउलट मराठी माध्यमाच्या अनेक मुलांना परीक्षेत उत्तरपत्रिका पूर्ण करता येत नाही, कारण वेळ पुरत नाही.

उत्तरपत्रिका पूर्ण न होण्यामागे देवनागरी लिपी देखील कारण आहे. या लिपीत लिहिताना साधारण 15 टक्के वेळ शब्दांच्या वर रेघ ओढण्यातच जात असतो. इंग्रजी (रोमन) लिपीत हा प्रकार नाही, शिवाय या लिपीमध्ये खूपच भरभर लिहिता येते. देवनागरी लिपी किचकट आहे, इंग्रजी (रोमन) लिप्ती असा किचकटपणा नाही.

मराठी माध्यमाच्या शाळांतून विद्यार्थ्यांवर वेगेवेगळ्या प्रकारे अंधश्रद्धा लादण्याचे लादण्याचे काम चालू असते. प्रत्येक वर्गात देव-देवतांचे फोटो अडकवलेले असतात. गुरुवारी दत्ताची तर शनिवारी मारुतीची आरती होत असते. गणेशोत्सव साजरा केला जातो. मुलींना हळदी-कुंकूसारख्या गोष्टी करायला लावल्या जातात. यामूळे मुले-मुली अंधश्रद्धाळू बनतात.

मराठी मेडियमच्या बाबतीत इतरही काही सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत, त्यांची इथे चर्चा करणे योग्य होणार नाही.

इंग्रजी माध्यामाच्या शाळेतील शिस्त फारच कडक असते. तेथील शिक्षणही उच्च दर्जाचे असते. या दोन्ही गोष्टींचा विद्यार्थ्याला पुढील आयुष्यात चांगलाच उपयोग होतो.

साधारणपणे असे दिसून येते की इंग्रजी माध्यमात शिकलेले विद्यार्थी चलाख, उच्च आकलन शक्ती असणारे, चांगले संवादकौशल्य असणारे असतात, आणि पुढील जीवनात ते अतिशय यशस्वी होतात.

पुढे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण इंगजी माध्यमातूनच घ्यायचे असते. शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झाल्यास त्यांना इंग्रजी माध्यमात उच्च शिक्षण घेणे सोपे जाते. तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे म्हणूनच गरजेचे आहे.

इंग्रजी भाषेतून जी माहिती आणि ज्ञान मिळते ते मराठी भाषा देऊ शकत नाही. भाषा हे संवादाचे, माहिती आणि ज्ञान मिळवण्याचे साधन आहे, अस्मितेचे नव्हे, ही गोष्ट लक्षात घेतलेली बरी!

इंग्लिश मेडीयम

हेही वाचा:

माझं शालेय जीवन: चिंचवड

हौशी लेखकांसाठी चार शब्द ….

मी व्हिगन झालो त्याची गोष्ट….

प्रेमकथा: लव्ह जिहाद

TheyWon English (Online Magazine)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Please follow and like us:
0
fb-share-icon20
Tweet 20
Pin Share20

2 thoughts on “तुमच्या मुलांना इंग्लिश मेडीयममध्येच शिकवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Facebook20