They Won मराठीसाठी तुमचे लेख आणि लघुकथा पाठवा
आम्ही आमच्या They Won या मराठी ऑनलाईन मॅगेझिनसाठी माहितीप्रद लेख आणि प्रेरणादायक लघुकथा लिहिणाऱ्या हौशी लेखकांच्या शोधात आहोत. लेखनाची आवड असणाऱ्या लेखक आणि लेखिकांचे आम्ही स्वागत करतो. तुम्ही गृहिणी, शिक्षक, विद्यार्थी, उद्योजक अशा कोणत्याही पार्श्वभूमीचे असोत, आम्ही तुम्हाला तुमचे लेखन प्रकाशित करण्यासाठी हा मंच उपलब्ध करून देत आहोत.
विषय
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही विषयांवर लेख लिहू शकता:
यशोगाथा, व्यवसाय, उद्योग, उद्योजकता, स्टार्टअप्स, क्रीडा, मनोरंजन, माध्यमं, साहित्य, आरोग्य, विज्ञान, संशोधन, शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यटन, साहस, निसर्ग, इतिहास इत्यादी.
याशिवाय, आम्ही प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक लघुकथा देखील स्वीकारतो.
लेखक व यशस्वी व्यक्ति आपल्या यशोगाथाही लिहू शकतात.
विषयांची साधारण कल्पना येण्यासाठी marathi.theywon.in ही वेबसाईट पहा.
शब्दमर्यादा
लेख व लघुकथा किमान 700 ते जास्तीत जास्त 1500 शब्दांपर्यंत असाव्यात.
मानधन
नवोदित लेखकांना संधी देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे, बहुतांश वेळा मानधन दिले जाणार नाही. मात्र प्रकाशित झालेल्या लेख/लघुकथेतबरोबर तुमचा संक्षिप्त परिचय व फोटोही प्रकाशित केला जाईल. तुमचे साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेतली जाईल. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि तुम्ही सातत्याने लिहाल तर एक प्रसिद्ध लेखक/लेखिका अशी तुमची ओळख तयार होईल.
विशेष दर्जेदार लेख किंवा लघुकथेसाठी रुपये 500 ते 1000 पर्यंत मानधन दिले जाऊ शकते.
जाहिरातीसाठी लेख
जर लेख कोणत्या उत्पादन किंवा सेवेला प्रोत्साहन देणारा (Promotional) असेल, तर त्यासाठी अल्प शुल्क आकारले जाईल. हे शुल्क वेबसाइटच्या खर्चासाठी वापरले जाईल.
लेख, लघुकथा कशा पाठवाव्यात
लेख, लघुकथा फक्त ई-मेलद्वारे पाठवा. लेख, लघुकथा MS Word फाईल किंवा साध्या टेक्स्ट फाईलमध्येअसाव्यात. (PDF इत्यादी स्वरूप आम्हाला सोयीचे नाहीत). छायाचित्रे ईमेलला फाईल स्वरूपात जोडा (Attachment).
आमचा ईमेल पत्ता: editorial@theywon.in
अतिशय महत्त्वाचे
तुमचे लेख आणि लघुकथा तुम्ही स्वतः लिहिलेल्या असाव्यात (Original) आणि ऑनलाईन पूर्वप्रकाशित नसाव्यात. (मुद्रित माध्यमांत आधी प्रसिद्ध झालेल्या लघुकथा व लेख चालतील).
कृपया साहित्य चोरी (Plagiarism) टाळा आणि तुमच्या सर्जनशीलतेला वाव द्या.
डिंपल ओसवाल
मुख्य संपादिका, They Won मराठी
They Won Group कडून प्रकाशित होणारे ऑनलाईन मॅगेझिन्स: