Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!

संकेत मुनोत

आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो असता मला एक परिचित गृहस्थ भेटले.
त्यांना मी नमस्कार करत म्हणालो, ‘happy New year, काका!’
त्यावर ते म्हणाले, ‘अरे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आत्ता नाही तर पाडव्याला देणार’
‘का बरं?’
‘कारण हे आपलं नवीन वर्ष नाही, ते ख्रिश्चनांचं आहे!’
‘काका, तुमचा वाढदिवस कधी असतो?’
’28 जूनला’
‘ मग तो का नाही तिथी प्रमाणे साजरा करत?’
‘ अरे ते वेगळं!’
‘ते का वेगळं? आणि मुळात वाढदिवस साजरा करणे ही ‘आपली’ प्रथा आहे का? आपल्या संस्कृतीत फक्त जयंत्या आणि मयंत्या करायच्या असतात ना?”
‘….’
‘आणि परवा ख्रिसमसला ही Santa नको वासुदेव असा मेसेज तुम्हीच पाठवला होता ना?’
‘बरोबर, अरे आपली संस्कृतीचे रक्षण करायला हवे, आपल्या संकृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण झालं आहे!’
‘पण तुमचा शंतनू तर तिकडे अमेरिकेत ख्रिसमस party celebrate करतोय. परत शर्वरीने पण अमेरिकेतून Santa Clause आणि ख्रिसमस झाडा सोबत फोटो टाकलाय! मग त्यांना का नाही सांगत तुम्ही याबद्दल? आणि तुम्ही तुमच्या मुलांना का नाही वासुदेव बनवले? मुलगा नाहीतर निदान नातवांना बनवा की! तिकडे अमेरिकेत फिरू देत वासुदेव होऊन ! तेवढाच प्रचार होईल आपल्या संस्कृतीचा तिकडे!

काकांना काही उत्तर सुचेना.
मग मी म्हणालो, ‘म्हणजे स्वतःच्या पोरांना उच्च शिक्षण देऊन परदेशात पाठवायचे, त्यांनी सगळे ख्रिस्ती सण साजरे करायचे आणि इकडे मात्र सामान्य लोकांना एकमेकांच्या विरुद्ध जाती धर्मावरून भडकवायचे..?’
काकांनी विषय बदलत काकूंना हाक मारली “अगं माधवी, तुझा पाय दुखत होता ना? चल आज डॉक्टरकडे जाऊया.. येतो रे संकेत..’
‘हो हो, मी पण चलतो, पण काका, काकूंना वैद्याकडे न्या, उगीच कशाला डॉक्टरकडे घेऊन चाललात? आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!’

सांता क्लॉज आणि वासुदेव
संकेत मुनोत हे गांधीवादी कार्यकर्ते आणि लेखक आहेत.

हेही वाचा:

Raigad | रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

संपुर्ण जगाचे एकच राष्ट्र! One Global Nation

जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage

गौरी आणि फेस रीडर | Gauri

3 thoughts on “Santa आणि Vasudev | आपली संस्कृती सांभाळायला पाहिजे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *