Sanjay Sonawani: Author, Researcher, Public Speaker
संजय सोनवणी हे एक प्रसिद्ध लेखक, इतिहास संशोधक, अर्थतज्ञ, विविध विषयांचे अभ्यासक आणि वक्ते आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्यांनी आजपर्यंत विविध विषयांवर शेकडो पुस्तके लिहिली आहेत.
संजय सोनवणी यांचा जन्म जळगाव येथे 14 ऑगष्ट 1964 रोजी झाला.
इतिहास संशोधक
इतिहास हा त्यांचा अतिशय आवडीचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्याचं इतिहास संशोधन केवळ एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी, काळाशी, प्रांताशी अथवा विषयाशी संबंधित नाही. त्यांनी जगातील अतिशय प्राचीन अशा विविध संस्कृतींशी संबंधित इतिहासावर सखोल संशोधन तर केले आहेच, त्याचबरोबर भारतातील सिंधू संस्कृती, प्राचीन श्रमण परंपरा, शैव परंपरा, वैदिक परंपरा यांच्यावरही संशोधन केलेले आहे. त्यांचे हे संशोधन अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहे.
त्यांचे काही महत्वाचे शोधनिबंध पुढील लिंकवर वाचायला मिळतील: researchgate.net/profile/Sanjay-Sonawani
त्यांचे हे सर्व संशोधन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेच, शिवाय ते त्यांच्या ब्लॉग्सवर, यू ट्यूब चॅनेलवर आणि सोशल मिडीयात प्रसिद्ध झालेले आहे. त्याचबरोबर त्यांचे अतिशय महत्वाचे रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांनी भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर विपुल संशोधन आणि लेखन केले आहे.
संजय सोनवणी यांनी संशोधनात्मक लिखाणाबरोबरच ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत.
लेखक
संजय सोनवणी यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यांनी विविध विषयांवर हजारो लेख आणि कथा लिहिल्या आहेत, तसेच या तीनही भाषांमध्ये त्यांची शेकडो पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तीन भाषांमध्ये विपुल लिखाण करणारे ते एकमेव लेखक असावेत. त्यांच्या बहुतांश पुस्तकांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत.
त्यांचे लेख विविध मराठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या कथा स्टोरी टेल व इतर ठिकाणी ऑडीओमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांची पुस्तके प्राजक्त प्रकाशन, चिनार पब्लिकेशन्स आणि इतर प्रतिथयश प्रकाशकांनी प्रकशित केली आहेत.
त्यांची एक ओळख म्हणजे ते एक रिबेलीअन लेखक आहेत, त्यांनी केलेले संशोधन आणि मांडलेले विचार प्रस्थापित मतांना छेद देतात.
व्याख्याते
एक संशोधक आणि लेखक यांच्याबरोबरच ते एक उत्कृष्ठ व्याख्यातेही आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राबाहेरही हजारो व्याख्याने दिली आहेत. त्यांची व्याख्याने प्रामुख्याने इतिहास आणि समाजप्रबोधन या विषयांवर असतात.
अभिनेता आणि मॉडेल
संजय सोनवणी यांनी एकेकाळी मॉडेल म्हणूनही काम केले आहे. अमानुष एक थरार या मराठी सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून कामही केले आहे.
गीतकार आणि गायक
संजय सोनवणी यांची एक ओळख गीतकार आणि संगीतकार अशीही आहे. त्यांनी अमानुष एक थरार या सिनेमाची काही गीते लिहिली आणि गायलीही आहेत. प्रसिद्ध गायीक उषा मंगेशकर यांनी गायलेले ‘तू जरा येशील का…?’ आणि प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांनी गायलेली ‘आओ चलें… हम संग चलें’, ‘ए जानेजान’, ‘ओ निंदिया’, ‘चंदनिया’ ही गीते संजय सोनवणी यांनी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहेत.
उद्योजक आणि अर्थतज्ञ
त्यांनी एकेकाळी वाशिंग्टन सॉफ्टवेअर ही कंपनी सुरु केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी पुष्प प्रकाशन ही प्रकाशन संस्था सुरु केली आणि या प्रकाशन संस्थेमार्फत मराठीमध्ये त्यांनी ‘पेपर बॅक’ पुस्तके वाचकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिली. याशिवाय त्यांनी इतरही अनेक उद्योग उभारले.
व्यवसायानिमित्त ते चीन, जपान आदी देशांना जाऊन आले आहेत.
ते एक अर्थतज्ञही आहेत आणि आर्थिक विषयांवर आपले विचार मांडत असतात आणि युवकांना व्यावसायिक होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात.
संजय सोनवणी यांची काही गाजलेली पुस्तके
मराठी पुस्तके
- हिंदू धर्माचे शैव रहस्य
- हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास
- ऋषभनाथ आणि शिव एकच?
- असूरवेद
- प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास
- शून्य महाभारत
- महाराजा यशवंतराव होळकर
- धनगरांचा गौरवशाली इतिहास
- तृतीय नेत्र
- भाऊ परतौनी आला
- क्लिओपात्रा
- शोध भारत नावाचा
- शिवाजी महाराजांची हेर व्यवस्था
- भाषेचं मूळ
- जैनांचे मराठी भाषेतील योगदान
- काश्मीरचा सम्राट ललितादित्य
- बॅरिस्टर वीरचंद गांधी
- हिरण्य दुर्ग
- हरिभाऊ नरके आणि मी
- दहशतवादाची रूपे
- कुशाण
- कल्की
- अश्वत्थामा
- मी मृत्युंजय मी संभाजी
- भविष्य नावाचा इतिहास
- दिवस तसेही दिवस असेही (आत्मचरित्र)
- आदमची गोष्ट (कथासंग्रह)
- आभाळात गेलेली माणसं (विज्ञान कादंबरी)
इंग्रजी पुस्तके
- Origin of the Country Name Bharat
- Origins of Vedic Religion and Indus Gagghar Civilization
- Emperor of Kashmir Lalitaditya the Great
- On the Brink of Death
हिंदी
- प्राकृत और पाली भाषाओं का इतिहास
संपर्क तपशील
ई-मेल: sanjaysonawani@gmail.com
फोन: 9860991205
फेसबुक: facebook.com/sanjay.sonawani.5
ब्लॉग
sanjaysonawani.blogspot.com
YouTube Channel
youtube.com/@SanjaySonawani
तुमचाही परिचय द्यावा …..
तुम्ही जर सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय क्षेत्रात काम करत असाल, किंवा तुम्ही एक यशस्वी उद्योजक, लेखक, कलाकार (अभिनेते, गायक, गीतकार, संगीतकार, डान्सर इत्यादी), खेळाडू असाल, किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात भरीव काम करत असाल, तर या वेबसाईवर तुमचा परिचय प्रकाशित करायला आम्हाला आवडेल. अधिक माहितीसाठी कृपया 8149128895 या नंबरवर फोन करावा अथवा WhatsApp मेसेज पाठवावा.
हेही वाचा:
ऍडव्होकेट रमेश उमरगे : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व | डिम्पल ओसवाल: लेखिका, संपादिका, सामाजिक कार्यकर्त्या |
मराठी लघुकथा | इतिहास या विषयावरील लेख |
TheyWon Marathi (मराठी लघुकथा, लेख आणि कविता)
2 thoughts on “संजय सोनवणी: लेखक, इतिहास संशोधक, वक्ता”