Marathi Story: इन्सल्ट : दिशाची गोष्ट

महावीर सांगलीकर

दिशाची गोष्ट भाग 11: दिशाची गोष्ट या दीर्घकथेचा 11वा भाग

आज दिशाला तिच्या पुनर्जन्मांचं विश्लेषण द्यायचं, त्यानंतर शक्यतो गोडीत, तिच्या कलाने घेत तिच्याशी संबंध तोडायचे असे मी ठरवलं होतं. नाही जमलं तर दुसरा मार्ग आहेच. प्लॅन बी.

नेहमीप्रमाणे मी सायबरकॅफेत गेलो आणि मेसेंजरमध्ये लॉग इन झालो. दिशाही मेसेंजरमध्ये हजर होतीच.

मी तिला Hi! असा मेसेज पाठवला. तिनेही लगेच Hi! असे उत्तर दिले.

मग वेळ न दवडता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालण्याचं ठरवलं. एवढ्यात तिनं विचारलं,
‘आपण कधी भेटायचं?’
‘दिशा, मी तुला या जन्मी भेटणार नाही. पुढच्या जन्मी नक्की भेटू, खरेच असेल पुनर्जन्म हा प्रकार तर’
‘या जन्मात आपण नुसतीच भेट घ्यायला काय हरकत आहे…?’
‘हे बघ दिशा, तू वेगवेगळ्या विषयांवरचं बरंच कांही वाचलं आहेस, वाचत असतेस. लहानपणापासून….. कथा, कादंबऱ्या, इतिहास, धर्म, तत्वज्ञान, गुढविद्या, रहस्यकथा…. आणखी बरंच कांही… आता तर तू कथाही लिहीत असतेस’
‘मग? त्याचा इथं काय संबंध?’
‘तू ज्यांना पूर्वजन्म समजतेस, त्या प्रत्यक्षात तुझ्या सुप्त मनात तयार झालेल्या काल्पनिक कथा आहेत. पण त्या गोष्टी ख-याच घडलेल्या आहेत असे तुला वाटत असतं’
‘……..’
‘मला तुझं कौतुक वाटतं.. त्या कथा इतक्या परफेक्ट आहेत की खऱ्याच वाटाव्यात. इतक्या परफेक्ट कथा बनण्याचं कारण म्हणजे तू उत्कृष्ट स्टोरी टेलर आहेस आणि तुझ्या ज्ञानाचा तर प्रश्नच नाही’
‘तुम्ही असं पटवून सांगत असता की ते खरंच वाटावं… पण मिस्टर महावीर, त्या काल्पनिक कथा नाहीत हो…. त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी आहेत’
‘थांब…. तुझी ती पहिल्या जन्माची कथा…. त्यातल्या अनेक गोष्टी इतिहासात प्रत्यक्षात घडलेल्या आहेत…. पण तुझ्या बाबतीत नव्हे. तुझ्या सुप्त मनानं वेगवेगळ्या घटना एकत्र करून एक नवीनच गोष्ट बनवली. ती म्हणजेच तुझा पहिला जन्म…’
‘नाही हो….’
‘तसंच आहे. तुझी ती गोष्ट म्हणजे एक हजार वर्षांपूर्वीचा जैन-वैष्णव-शैव यांच्यातील धार्मिक संघर्ष, शिलाहार राजकन्या चंद्रलेखा आणि चालुक्य राजकुमार विक्रमादित्य यांचं लग्न, राणी अबक्का, गांधीजींचा खून, इंदिरा गांधींचा खून अशा अनेक गोष्टींचं परम्युटेशन-कॉम्बिनेशन आहे’
‘………..’

दिशाची गोष्ट भाग 11

दिशाची गोष्ट भाग 11:  Disha in illusion.

‘आणि तुझी ती लाजवंती बाईची गोष्ट… ती दुसरं महायुद्ध, त्यातील भारतीय सैनिकांचा सहभाग, राजपूत लोक यांच्या तुला असलेल्या माहितीतून तयार झालेली आहे. 1857 ची गोष्ट… तीही तुझ्या सुप्त मनात तयार झालेली गोष्ट आहे, पण तिला तू तुझा मागचा जन्म समजतेस’
‘पण मग तारखा… साल… त्यांचं काय?’
‘तुला न्यूमरॉलॉजीचे बेसिक ज्ञान आहेच. त्यामुळं तुझ्या सुप्त मनानं कथेत त्या-त्या काळातील तुला योग्य अशा तिथ्या किंवा तारखा निवडलेल्या दिसतात. तू बहुतेक वेळी स्वत:साठी 1 ही तारीख किंवा तिथी निवडलेली दिसते, याचं कारण म्हणजे एक हा अंक सर्वात महत्वाचा आहे आणि तो सर्वात पुढे असतो. तुला सर्वात पुढे रहायला आवडतेही. एक हा अंक चार या अंकाकडे आकर्षित होत असल्याने तो तू मला बहाल करून टाकलेला दिसतो’ .

‘आणखी एक गोष्ट म्हणजे तुला तुझ्या जोडीदाराच्या मृत्यूचं जबरदस्त आकर्षण आहे. त्याचा मृत्यू हा तुझ्या सर्व कथांचा मुख्य भाग आहे. प्रत्येक कथेत तू तुझ्या जोडीदाराला मारून टाकतेस. पहिल्या जन्माच्या कथेत तर तू जोडीदाराबरोबरच इतर अनेक मोठमोठ्या लोकांना मारून टाकलं आहेस. वेगवेगळ्या प्रकारे. तुझ्या सुप्त मनाने केलेले हे खूनच आहेत. यु आर अ मर्डरर…. तुझ्या एकाही जन्मात तुला भाऊ नाही. त्याचं कारण तुला या जन्मात भाऊ नाही आणि तो नाही याचा तुला आनंद वाटत असतो हेच आहे’
‘मला तुमचं हे विश्लेषण पटत नाही… कधीच पटणार नाही… पण मी जे म्हणते ते तुम्हाला एक ना एक दिवस पटेल. खात्री आहे माझी. पण तुम्हाला पटेल तोपर्यंत खूपच उशीर झालेला असेल’
‘मला वाटतं, तुला मानसोपचाराची गरज आहे’

‘….. तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही. फरगेट ऑल धिस… आता शेवटचं विचारते तुम्हाला … तुम्ही मला भेटणार आहात की नाही…?’
‘दिशा, मी तुला अजून किती वेळा सांगू की मला तुला भेटण्याची इच्छा नाही…’
‘प्लीज… आपण फक्त एकदाच भेटू…. नंतर पुन्हा कधीच भेटायचं नाही….’
‘हे म्हणजे फक्त एकदाच मरू… पुन्हा कधी मरायचं नाही असं म्हणण्यासारखं आहे’
‘बी सिरिअस… कधीही कसले जोक्स करता…’
‘आय एम सिरिअस… फक्त तुझं टेन्शन घालवण्यासाठी तसे बोललो..’
‘एवढी काळजी आहे तर भेटावं येऊन’
‘हे बघ दिशा, तुझा पुनर्जन्मावर पक्का विश्वास आहे ना?’
‘हो..’
‘मग थांब की आणखी 50-60 वर्षे. तोपर्यंत मी मरेनच. तू येशीलच माझ्या मागोमाग पुढच्या जन्मात. मग आपण भेटू… त्यावेळी तू म्हणशील तसं होईल’.
‘…….’
‘इतके जन्म थांबलीस… अजून 50-60 वर्षे कळ काढ…’
‘नाही थांबणार…’
‘मीही तुला नाही भेटणार..’
‘मी पुण्याला तुमच्या घरी येईन… अचानक..’
‘एक एप्रिलला आली होतीस तशीच ना? तशी येणार असशील तर माझी हरकत नाही’
‘तशी नाही… खरोखरच येईन’
‘वेल, तुला माहीत आहे मला इंट्यूशन होत असतं.. त्यामुळं तू कधीही आलीस तरी मी तुला सापडणारच नाही. मी त्यावेळी कुठंतरी दूर, टूरवर किंवा गावी गेलेलो असेन. उगीच तुझा हेलपाटा होईल’

दिशाची गोष्ट भाग 11

‘मिस्टर महावीर, मला भेटायला तुम्ही काय घ्याल?’
‘व्हाट डू यू मीन?’
‘आपण सिंगापूरला जायचं का? आपण तिथं भेटू… मी सगळा खर्च करेन’
‘लाच…? प्रियकराला भेटण्यासाठी…? सॉरी, मला हे मान्य नाही… ’
‘मग तुम्हाला काय पाहिजे?’
‘सुटका.. तुझ्यापासून मला सुटका पाहिजे…’
‘मिस्टर महावीर… हे तुम्ही काय बोलत आहात? तुमची सुटका करायला मी कुठं तुम्हाला डांबून ठेवलंय?’
‘दिशा, गेले तीन महिने तू व्हर्च्युअली मला बांधूनच ठेवलं आहेस. माझं माझ्या कामावर लक्ष नाही. जेवणाचंही भान नाही. झोपेत पण तुझाच विचार…  दिवसभर सायबर कॅफेत बसून तुझ्याशी चॅटिंग करायचं, रोज रात्री दोन-तीन तास फोनवर बोलायचं.. पैसे जातात त्याची मला फिकीर नाही… पण हे असं किती दिवस चालायचं… आता तूच सोडव मला याच्यातनं…’
‘मिस्टर महावीर, गेले तीन महिने माझी काय अवस्था झालीय हे तुम्हाला माहीत आहे काय?’
‘मी समजू शकतो… पण आता बस्स झालं. वुई शुड स्टॉप ऑल धिस नॉनसेन्स’
‘आपण खरंच हे थांबवू या.. पण आधी भेटूया… एकदाच’
‘सॉरी.. ते नाही जमणार…. प्लीज… नाहीतर मला तुझ्याशी भांडण करावं लागेल. तुझा इन्सल्ट करावा लागेल…’
‘मी मागं तुम्हाला बोलले होते… डोन्ट हर्ट मी… इफ यु डू सो, यु विल बी नो व्हेअर’ 
‘चालेल… माझं काय व्हायचं ते होवो, पण आता बस्स झालं. सध्या माझी जी वाईट अवस्था झाली आहे त्याच्यापेक्षा तर वाईट कांही नाही होणार…… कधी कधी वाटतं मी तुझ्या इमेलला उगीचच उत्तर दिलं. ते दिलं नसतं तर आपल्या दोघांच्या दृष्टीने चांगलं झालं असतं. दिशा तू का आलीस परत माझ्या जीवनात?’
‘असाच प्रश्न मी पण विचारू शकते… आहे उत्तर तुमच्याकडं?’
‘…..’
‘प्लीज….. मी आताच सिंगापूरची तिकिटे बुक करायला सांगते. आपण भेटू… मग आपले मार्ग वेगळे…’

दिशाची गोष्ट भाग 11

ही दिशा सरळ सांगितलेलं काही ऐकत नाही. आता प्लॅन बी चा वापर करायला पाहिजे.

‘ओके दिशा… आय हॅव चेंजड माय माइंड… मी तुला भेटायला तयार आहे. पण त्यासाठी सिंगापूरला जायची गरज नाही…. तसाही माझ्याकडं पासपोर्ट वगैरे नाही आहे… आपण लोणावळ्याला भेटू. पण माझी एक अट आहे…’ 
‘सांगा… तुमची कोणतीही अट मला मान्य आहे’
‘मी तुला भेटलो तर माझा कांहीतरी फायदा व्हायला पाहिजे’
‘वेल, सांगा काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडून…’
‘तूच सांग. तू काय देवू शकतेस मला?’
‘मनी? हाऊ मच मनी  डू यू वांट?’
‘तुला माहीत आहे मी मनी ओरिएंटेड माणूस नाही आहे’
‘वेल, मी तुम्हाला युरोपच्या टूरवर पाठवेन…तुम्ही पासपोर्ट काढून घ्या’
‘नको… आय एम नॉट इंटरेस्टेड’
‘मग तुम्हाला काय पाहिजे..?’
‘ते तूच ठरवायचं आहेस. मला पटलं तर मी हो म्हणेन…’
‘ओके… मी तुमचं एखादं पुस्तक प्रकाशित करेन’
‘नो वे… नॉट इंटरेस्टेड’
‘मग तुम्हाला पाहिजे तरी काय? डू यु वांट टू स्लीप वुईथ मी?’
‘दिशा, तू शुद्धीत आहेस का? इतक्या खालच्या पातळीवर जाशील असं वाटलं नव्हतं मला… छे, काय फालतू पोरगी आहे ही… गिरी हुई औरत….  आज पासून तुझा आणि माझा काडीचाही संबंध नाही….. गेट लॉस्ट … परत जर माझ्या मेसेंजरमध्ये दिसलीस तर बघ’
‘वाह मिस्टर महावीर… यू आर ओव्हर स्मार्ट. तुमची चाल आली माझ्या लक्षात…. यू प्लेयड या व्हेरी डर्टी गेम उइथ मी… माझ्याच तोंडून माझा इनसल्ट करायला लावलात… यू हॅव डन अ ग्रेट मिस्टेक… आता बघा मी तुमची कशी वाट लावते ते…’
‘कर तुला काय करायचं ते… माझ्याकडंपण दुसरा ऑप्शन नव्हता… तुला हर्ट करण्याशिवाय.. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर इट… नाऊ गेट लॉस्ट… सुखानं जगू दे मला.. तूही सुखानं जग. लव्ह यू… टेक केअर, बाय.. सी यू इन द नेक्स्ट बर्थ… इफ रिअली देअर इज सच अ थिंग ’

दिशा मेसेंजर मधून गायब झाली… मी सुटकेचा श्वास सोडला. आता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. आज आपण जे केलं ते चुकीचंच होतं, पण ते करण्याची गरजही होती. डोक्यावरचं एक ओझं कमी झालं होतं. तिनं दिलेल्या धमकीकडं सिरीअसली बघण्याची गरजही नव्हती. करून करून काय करणार आहे ती?

दिशाची गोष्ट भाग 11

पुढे चालू …..

दिशाची गोष्ट या दीर्घकथेचे आधीचे भाग ….

1 पत्रमैत्रिण2 पत्रमैत्रिण (भाग 2)3 दिशाची पुन्हा एन्ट्री
4 दिशा विविध भारतीवर5 दिशाच्या वागण्यामागील रहस्य6 राजकुमारी निर्भया
7 राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन8 दिशाचं वेगळं रूप9 अनबिलिव्हेबल दिशा
10 1857 ची बंडखोर दिशा

आणखी मराठी कथा ….

भयकथा: न जन्मलेली बाळं

फ्रेंडशिपमधलं भांडण!

आस,सगळ्यांसाठी असते खास

दिनकरचं लग्न

TheyWon English (Online Magazine)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *