विचारधन परिवर्तन | Marathi Quotes

ॲड. कैलासराव विश्वनाथ पठारे पाटील

नदीचे पाणी गोड असते कारण ती सदैव देत असते समुद्राचे पाणी खारट असते कारण तो घेत असतो. गटारातील पाणी दूषित असते कारण ते थांबलेले असते. हेच तर जीवन आहे. देत राहाल तर गोड लागेल घेत राहाल तर खारट लागेल आणि जागेवर थांबाल तर बेकार व्हाल.

इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात फरक एवढाच की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात.

आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्याला ठरवायला लागते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा.

वीज पाण्यातच असते, त्याला फक्त गती देण्याची गरज असते. लोणी ताकातच असते फक्त त्याला घुसळण्याची गरज असते. तसे समाधान देखील स्वतः जवळच असते फक्त त्याला स्वतः मध्ये शोधून आपल्या आचार विचार व कृतीतून मिळवावे लागते.

आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.

पाऊसात तुम्ही छञी घेऊन जात असाल तर एक तर छञी सरळ डोक्यावर घेणे आवश्यक आहे. जर दरवेळी पाऊसात तुमचा खांद्याचा निम्मा भाग भिजत असेल तर बायकोला संशय वेगळाच येतो .. दरवेळी यांचा निम्मा खांदाच का बरे भिजतो, बाकी काही नाही? पाऊसात काळजी घेतलेली बरं.

प्रेमाचं सौंदर्य नेमकं कशात आहे हे सांगताच येत नाही. प्रेम ही काही सजवलेली गोष्ट नव्हे. प्रेम हे घडवलं जात नाही किंवा ते संपादन सुध्दा करता येत नसतं. घडवलं जाणारे किंवा संपादित केलं जाणारं प्रेम हे प्रेम असूच शकत नाही.

प्रेम ही एक निसर्गदत्त जाणीव आहे स्वतःच्या सहवासावर प्रेम करायला शिकलं की आयुष्य जगण्यासाठी कुणा दुसऱ्याच्या सहवासाची गरज भासत नाही.

दृष्टी अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत नाही .

जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतली कि माणूस कधीच थकत नाही.

समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंडी झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो.

आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही.

जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण इथे वन्समोअर
नसतो✍️

👏विचारधन परिवर्तन👏

ॲड. कैलासराव विश्वनाथ पठारे पाटील
हे भारतीय पत्रकार संघाच्या (AIJ) लिगल विंग
(महाराष्ट्र राज्य)चे अध्यक्ष आहेत.

आणखी काही……

प्रेम-काजवा | Love Letter

रामराज्य म्हणजे नक्की काय रे भाऊ….!

Marathi Story | गूढकथा: सलोनी राठोड

जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *