Love Talk: हॅलो, मी बोलतेय!

महावीर सांगलीकर

Marathi Love Talk #गॉसिपिंग #फ्लर्टिंग #LoveChat

“हॅलो!”
“हॅलो, कोण बोलतय?”
“मी बोलतेय!”
“मी म्हणजे कोण?”
“माझा आवाज नाही ओळखलात?”
“सॉरी, नाही ओळखला. त्याचं काय आहे, मला फक्त महत्वाच्या लोकांचेच आवाज ओळखता येतात”
“माझा नंबर सेव्ह केलेला नाही तुमच्याकडे?”
“नाही ना! असता तर तुम्ही कोण हे लगेच ओळखलं असते ना मी तुमच्या नावासकट!”
“अहो, मी लता बोलतेय”
“कोण लता? मंगेशकरांची का?”
“अहो, चेष्टा काय करताय? मी लता भोसले बोलतेय!”
“लता भोसले….. हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं. तुम्ही गायिका आहात ना?”
“मला वाटतंय रॉंग नंबर लागलाय. तुम्ही कोण बोलताय?”
“तुम्ही कोणाला फोन केलाय?”
“प्लीज सांगा ना तुम्ही कोण बोलताय?”
“मी मी बोलतोय”
“मी म्हणजे कोण?”
“विसरलीस का?”
“………”
“माझा आवाज नाही ओळखलास?”
“नाही…. तुमच्या आवाजात प्रॉब्लेम आहे. आय मीन फोनच्या आवाजात प्रॉब्लेम आहे”
“बरं, चेष्टा बस्स झाली. का फोन केलास? कांही विशेष काम होतं का?”
“काम असलं तरच फोन करायचा का? तू मला फोन करत नाही म्हणून मी फोन केला”
“अगं, वेळच मिळत नाही बघ कोणाला फोन करायला”
“खोटं नकोस बोलू! … कधी बघेल तेंव्हा तुझा फोन एंगेजच असतो”
“अगं, क्लाएंट्सचे फोन येत असतात सारखे”
“निशा पण तुझी क्लाएंट आहे वाटतं… तिला बरं सारखं फोन करत असतोस?”
“तुला कसं माहीत?”
“आहे माहीत. ती तुला मिस कॉल देते आणि मग तू लगेच तिला फोन करता. तास-तासभर बोलत असतोस तू तिच्याशी”
“काय तरीच काय बोलतेस? तासाभरात काय बोलून होणार आहे तिच्याशी? हा हा हा”
“घे हसून! पण तुझं हे हसू जास्त काळ टिकणार नाही. तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे”
“काय?”
“फॉर यूवर काईंड अटेन्शन, निशाचं दुसरं पण एक अफेअर चालू आहे”
“चालू दे की मग! त्यात काय एवढं मनावर घेण्यासारखं?”
“ती म्हणे त्याच्याशी लग्न पण करणार आहे!”
“अरे वा! चांगली बातमी आहे. कुणीतरी मिळाला म्हणायचा तिला तिच्याशी लग्न करायला”
“तुला वाईट नाही वाटलं?”
“यात काय वाईट वाटायचं? पण तू तसलं कांही केलंस तर नक्कीच वाईट वाटेल”
“……..”
“बरं मग आज भेटायचं का संध्याकाळी?”
“अं…. नको! आज मला मैत्रीणीबरोबर जायचं आहे शॉपिंगला”
“ओके, ठीक आहे. आपण नंतर कधीतरी भेटू. चल बाय, टेक केअर”

Marathi Love Talk

थोड्या वेळाने……….

“हॅलो, मी बोलतेय!”
“बोल! आता काय झालं?”
“आज संध्याकाळी भेटायचं असं म्हणत होतास ना तू मघाशी?”
“हो, पण तूच नको म्हणालीस. शॉपिंगला जायचं आहे ना तुला तुझ्या मैत्रिणी बरोबर?”
“तिनं शॉपिंगला जायचं कॅन्सल केलं”
“अच्छा! तिनं जायचं कॅन्सल केलं म्हणून आपण भेटायचं? मग नको”
“………”
“तुझ्यात आणि निशात हाच फरक आहे बघ. मी भेटायला बोलावलं की ती सगळी कामं बाजूला टाकून येते”
“अरे तूला कळत कसं नाही?”
“सगळं कळतं”
“काय कळलं सांग बघू?”
“हेच की, शॉपिंगला जायचं तुझ्या मैत्रीणीनं नाही, तर तू कॅन्सल केलंस!”
“……..”
“ठीक आहे! ये मग संध्याकाळी शार्प सात वाजता झेड ब्रिजवर”
“तिथं नको!”
“का?”
“तिथं निशा असेल तिच्या बॉय फ्रेंडबरोबर त्या वेळेला”
“असू दे की मग!”
“नको! आपल्याला बघितलं तर नंतर ती माझ्याशी आणि तुझ्याशी पण भांडेल”
“मग कुठं भेटायचं?”
“सी.सी.डी.ला भेटू फर्ग्युसन रोडवर”
“त्यापेक्षा आपण शिवसागरला भेटू जेएम रोडवर”
“तिथं नको”
“का”
“तिथं माझा बॉय फ्रेंड ज्युनिअर मॅनेजर आहे. बघेल तो”
“छान! हे चाललंय काय तुझं? आणि तुला बॉयफ्रेंड्स आहेत तरी किती?”
“तुझं जे चाललंय तेच! आणि तुला जेवढ्या गर्लफ्रेंड्स आहेत ना, त्यापेक्षा जास्त बॉयफ्रेंड्स आहेत माझे!”
“ठीक आहे! आपण भेटायलाच नको मग! उगीच भांडणं व्हायची आपली लोकांसमोर”
“तुझ्याशी भांडण्यासाठीच तर भेटायचं आहे मला. तू भेट तर खरं, मग बघते तुझ्याकडं”
“कधी बघितलं नाहीस का मला? की पहिल्यांदाच भेटणार आहेस का माझ्याकडं बघायला? बाय द वे मला माहीत आहे तुला बॉयफ्रेंड वगैरे कोणी नाही आहे. खोटं बोलतेस तू”
“……..”
“खरं ना?”
“आहे आहे आहे! पण एकच आहे. मी तुझ्यासाठी त्याला सोडायला तयार आहे. पण तू पण निशाचा नाद सोडायला पाहिजेस”
“ठीक आहे, सोडेन! पण आधी तू तुला बॉयफ्रेंड आहे हे सिद्ध करून दाखव. आज आपण शिवसागरालाच भेटू. त्याच्याशी ओळख करून दे माझी”
“अरे पण त्याला वाईट वाटेल ना!”
“वाटू दे की! नाहीतरी त्याला सोडून देणारच आहेस ना तू? मग काय फरक पडतोय”
“पण आज त्याला सुट्टी असेल”
“मघाशी तर तू म्हणालीस तो तिथं असणार म्हणून…”
“मघाशी माझ्या लक्षात नाही आलं सुट्टीचं”
“ठीक आहे, मग आपण उद्या भेटू तिथं”
“नको! आजच भेटू”
“पण मग तुझा बॉयफ्रेंड कसा भेटणार आज?”
“अरे तुला कळत कसं नाही?”
“सगळं कळतं.. पण तुझ्या तोंडून ऐकावसं वाटतं”
“काय?”
“हेच की यू लव्ह मी”
“…….”
“म्हण ना”
“………”
“ठीक आहे, फोनवर नको म्हणूस, संध्याकाळी भेटल्यावर प्रत्यक्षात म्हण”
“तू ये वेळेवर… मग बघू… बाय”

महावीर सांगलीकर हे सिनिअर
न्यूमरॉलॉजिस्ट, मेंटॉर, मोटिव्हेटर,
कथालेखक आणि इतिहास संशोधक
आहेत.

हेही वाचून बघा!

पहिलं प्रेम …. First Love

Marathi Short Story : अनबिलिव्हेबल दिशा…..

प्रेम-काजवा | Love Letter

गौरी आणि फेस रीडर | Gauri

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English (Online Magazine)

One thought on “Love Talk: हॅलो, मी बोलतेय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *