श्रीमंत व्हायचंय? फुकटेपणा सोडा!

महावीर सांगलीकर

हा लेख लिहायचे कारण म्हणजे बरेच लोक माझ्याकडून फुकट सल्ल्याची अपेक्षा धरतात. पण फुकट सल्ला निरुपयोगी असतो हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. कोणताही सल्ला तुम्ही जेंव्हा विकत घेता तेंव्हाच त्याचा तुम्हाला उपयोग होत असतो.

फुकटेपणाची काही उदाहरणं …..

फुकटेपणाची काही उदाहरणं म्हणजे फुकट चहा, जेवण मिळत असेल तर तिथं जाणं, एखाद्या लग्नाच्या ठिकाणी आमंत्रण नसताना जाणं आणि तिथं जेवणं, मित्रांबरोबर हॉटेलमध्ये गेल्यावर बिल द्यायच्या वेळी सर्वात आधी बाहेर निघून जाण किंवा मागं रहाणं, स्वतः कधी बिल ना देणं, फुकट मिळतंय म्हणून ताटात भरपूर वाढून घेणं, हॉटेलमध्ये बडीशेप वगैरे भरपूर खाणं, व्यावसायिक सल्लागाराकडून फुकट सल्ल्याची अपेक्षा ठेवणं वगैरे.

फुकटेपणा तुम्हाला कंगाल बनवतो

कांही लोकांना भरपूर पैसे मिळत रहातात. त्यांच्याकडे पैशांचा सतत ओघ चालू असतो. तर दुसरीकडे अनेकांना नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या दोन्ही परिस्थितिमागे अनेक कारणे आहेत. त्यातील एका कारणाची माहिती मी येथे देत आहे.

तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह अडवणारे एक मोठे कारण म्हणजे फुकटेपणा हा असतो. तुम्ही जर तुम्हाला एखादी वस्तू, सेवा, मार्गदर्शन, माहिती वगैरे फुकट मिळावी अशी इच्छा बाळगत असाल, तसे प्रयत्न करत असाल, तर तुमची ही प्रवृत्ती निश्चितच तुमच्याकडे येणा-या पैशांच्या प्रवाहाला अडवून धरते.

हे असे का घडते? त्याचे उत्तर सोपे आहे. जेंव्हा तुम्ही फुकटे बनता, तुम्हाला फुकटेपणाची सवय लागते, तेंव्हा विकत घेण्याची आणि विकत घेण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्याची तुमची प्रवृत्ती आपोआपच कमी होते किंवा मरून जाते. फुकट जर मिळत असेल तर विकत कशाला घ्या? आणि फुकट जर मिळत असेल तर जास्त पैसे कशाला मिळवा? अशी घातक प्रवृत्ती तुमच्यात तयार होते.

फुकटेपणा हा एक मानसिक रोग आहे. फुकटेपणा आणि भीक मागणे यात फारसा फरकही नाही.

सोडा हा फुकटेपणा

फुकट मिळाल्याने आपले पैसे वाचतात असे तुम्हाला वाटू शकते, पण प्रत्यक्षात तुमचे पैसे वाचतच नसतात. फुकटेपणाने बचत करून तुम्ही स्वत:चेच नुकसान करत असता. याउलट तुम्ही जेंव्हा विकत घेत असता, तेंव्हा त्यासाठी लागणारे पैसे तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत असता. विकत घेतल्यामुळे तुमचा खर्च वाढतो, आणि खर्च वाढला की तुमचे उत्पन्नही वाढते. फुकटेपणा, कंजूषपणा तुम्हाला आळशी बनवतो, याउलट जर तुम्ही सढळ हाताने खर्च करत असाल तर आळस तुम्हाला शिवतही नाही. तुमचा लोकसंग्रहही वाढतो.

तुम्ही जर फुकटे असाल तर मित्र मंडळीत, नातेवाईकांच्यात, समाजात तुमची प्रतिमा कशी बनत असेल याचाही तुम्ही विचार करायला पाहीजे. याउलट तुम्ही जेंव्हा सढळ हाताने खर्च करणारे असता, तेंव्हा तुमची एक चांगली प्रतिमा तयार होत असते. याचाही तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढवण्यास मदत होत असते.

हे जसे व्यक्तीला लागू होते तसे समाजालाही लागू होते. कांही समाजांना सरकारी नोकरीत आरक्षण आहे, अनेक क्षेत्रात सोयी सवलती आहेत, याउलट कांही समाजांना या गोष्टी मिळत नाहीत. ज्यांना सोयी-सवलती नाहीत, आरक्षण नाही ते समाज स्वत:च्या बळावर सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेले दिसतात, तर ज्यांना या गोष्टी मिळतात ते समाज मागेच राहिलेले दिसतात.

पैशाकडे पैसा येतो, तसेच पैसे खर्च करणाऱ्याकडेही पैसा येत असतो. अनेकांना ही गोष्ट विचित्र वाटेल, पटणारही नाही, पण तुम्ही ही गोष्ट स्वत: अजमावून बघू शकता. तुम्ही जर कंजूष असाल, फुकटे असाल तर पैसे खर्च करायला शिका, तुम्ही दुसऱ्याकडून घ्याल त्याचा योग्य मोबदला देत चला, मग पहा काय घडते ते. या बाबतीत तुम्हाला कांही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.

हेही वाचा …..

बदल स्वीकारायला विरोध कशाला?

काय वाचाल तर वाचाल?

तुमच्या मुलांना इंग्लिश मेडीयममध्येच शिकवा!

माझं शालेय जीवन: चिंचवड

TheyWon English (Online Magazine)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

One thought on “श्रीमंत व्हायचंय? फुकटेपणा सोडा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *