महावीर सांगलीकर
फ्रेंडशिपमधलं भांडण! Marathi Story
आजकाल बेबी माझ्याशी नीट वागेनाशी झालीय. खूप विचित्र वागते. कधी काय बोलेल ते सांगता येत नाही. अगदी चार चौघातही माझ्याशी फटकळ बोलते.
म्हणजे नेहमीच ती अशी विचित्र वागते असं नाही. बऱ्याच वेळा ती माझ्याशी खूपच प्रेमानं वागते. माझी काळजी घेते.
पण तिचा मूड कधी बदलेल ते सांगता येत नाही.
तिच्या आयुष्यात खूप समस्या आहेत हे मला माहित आहे. त्यामुळे तिची चिडचिड होत असते.
कधीकधी आपला सारा राग माझ्यावर काढते.
म्हणजे मागे मीच तिला म्हणालो होतो काही झालं तरी तू तुझ्या मुलीवर राग काढत जाऊ नकोस. पण राग काढणे ही तुझी मानसिक गरज असेल तर तो तू माझ्यावर काढत जा. पण अति करू नकोस. हर्ट होईल असं काही बोलू नकोस.
पुढं ती लिमिटमध्ये राहून माझ्यावर राग काढू लागली.
मी तिला समजावून सांगत असे, शांत करत असे.
“बेबी कुल डाऊन, कुल डाऊन बेबी” असं म्हंटलं की लगेच शांत होत असे.
पण परवा जरा अतीच झालं.
त्याचं असं झालं….
परवा आम्हा मित्र-मैत्रिणींची सहल लोणावळ्याला गेली होती.
अर्थात बेबी देखील आमच्याबरोबर होतीच.
ती नसती तर ही कथा लिहिण्याची वेळच आली नसती.
खरं म्हणजे ती येणार नसती तर ही सहलच निघाली नसती.
म्हणजे ही सहल मीच आयोजित केली होती. माझ्या वाढदिवसानिमित्त.
वाढदिवस हे निमित्त. खरा हेतू बेबीबरोबर दिवस आनंदात घालवणे हा होता.
फ्रेंडशिपमधलं भांडण!
दिवसभर आम्ही खुप फिरलो. दुपारी दोन नंतर एका प्युअर व्हेज हॉटेलमध्ये जेवणही घेतले.
त्यावेळी तिथे माझा वाढदिवसही साजरा झाला.
म्हणजे केक वगैरे काही कापला नाही, पण सगळ्यांनी मिळून मला शुभेच्छा दिल्या, गिफ्ट्स ही दिल्या.
नंतर आमचा ग्रुप फोटोही काढला. नेहमीप्रमाणे फोटोमध्ये बेबी माझ्या शेजारीच उभी होती. अगदी चिकटून. पण फोटो सेशन झाल्यावर लगेच लांब निघून गेली.
बेबी थोडी हेल्दी आहे. तिचं वजन थोडं जास्त आहे.
पण तिला जाड म्हणता येणार नाही.
पण मी तिला नेहमीच जाडी म्हणून चिडवायचो.
आजही दिवसभरात मी तिचा सगळ्यांसमोर बऱ्याचदा जाडी असा उल्लेख केला.
तिनं ते हसण्यावर नेलं.
संध्याकाळी आम्ही सगळे लोणावळा रेल्वे स्टेशनला आलो, आणि लोकलने पुण्याकडे परत निघालो.
प्रवासात बेबी उदास वाटत होती.
माझ्यापासून लांब कोपऱ्यात खिडकीजवळ बसली होती. कुणाशी बोलत नव्हती.
तिच्या समोरची जागा रिकामी होती.
मी माझ्या जागेवरून उठून तिच्या समोर जाऊन बसलो.
समोर येऊन बसल्याचं तिला आवडलं नाही. तिनं मला बघून न बघितल्यासारखं केलं.
मी हळू आवाजात तिला विचारलं,
“काय झालं बेबी? तू अशी उदास का?”
तर ती हळू आवाजात नाराजीने म्हणाली, “मुझे तुमसे बात नहीं करनी है.”
तिच्या या बोलण्यानं माझ्या छातीत धस्स झालं.
ही असं काय म्हणते?
“क्या हो गया बेबी, मैंने कुछ गलत किया क्या?”
तिने काहीच उत्तर दिले नाही.
माझ्याकडे दुर्लक्ष करत खिडकीतून बाहेर बघू लागली.
तिचे डोळे ओले झाले होते.
मी तिला पुन्हा विचारले, “बेबी तुम्हे यह क्या हो गया है?”
तेव्हा ती तिच्या जागेवरून ताडकन उठली आणि पलीकडच्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन बसली.
एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं, या दोघांचं काहीतरी बिनसलं आहे.
नवितानं विचारलं, “काय झालं रे?”
मी म्हणालो, “तेच तिला विचारतोय, पण ती सांगत नाही. तू जाऊन बस तिच्याजवळ आणि विचार तिला काय झालं ते, प्लीज.”
नविता म्हणाली, “नाही रे बाबा, तूच परत एकदा विचारून बघ.”
मी बेबीजवळ गेलो तर ती जोरात म्हणाली,
“क्यों बार बार मुझे सता रहे हो? मुझे अकेला छोड दो! जाओ यहां से, नहीं तो मैं अपनी फ्रेंडशिप तोड दूंगी!”
हे ऐकून मला धक्काच बसला.
तिचं हे माझ्यावर ओरडणं सगळ्यांनी ऐकलं होतं.
मला हा माझा मोठा अपमान वाटला.
मला तिचा प्रचंड राग आला होता.
एवढ्यात चिंचवड आलं.
मित्रांचा निरोप घेत मी लोकलमधून उतरलो.
मी बेबीकडं बघितलंही नाही.
फ्रेंडशिपमधलं भांडण
घरी आलो त्यावेळी आठ वाजत आले होते.
आज बेबीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे.
तिला घरी जायला नऊ तरी वाजतील. तिला फोन केला तर ती उचलणार नाही.
रात्री व्हाट्स ऍप वर येईल तेव्हाच तिला गाठू.
मग मी कॉम्प्युटर वर माझी कामं करीत बसलो. पण कामात लक्ष लागेना.
सारखं व्हाट्स ऍप कड लक्ष होतं.
आली बया एकदाची ऑनलाईन. रात्री बारा वाजता.
मी तिला लगेच मेसेज पाठवला,
“आज मला माझ्या वाढदिवसानिमित्त खूपच भारी गिफ्ट मिळाली.
अपमान! इन्सल्ट! अपमान! सर्व मित्र मंडळींच्या समोर!
तोही माझ्या क्लोजेस्ट आणि बेस्ट मैत्रिणीकडून !
अशी गिफ्ट माझ्या आजपर्यंतच्या एकही वाढदिवसाला मिळाली नव्हती
थॅन्क यू बेबी फॉर धिस युनिक गिफ्ट”
मला वाटलं होतं, ती माफी मागेल. पण तिचं उत्तर आलं,
“शुरुआत किसने की? आज दिनभर तुमने मेरा कितनी बार इंसल्ट किया? मुझे कितना बुरा लगा होगा सोचा कभी?”
“मी तुझा अपमान केला? कधी?’
“याद करो आज तुमने कितनी बार मुझे जाडी कहा. सबके सामने!’
“हा हा हा ! तू जाडीच आहेस ना मग! जाडीला जाडी नाही म्हणायचं तर काय लुकडी म्हणायचं का? तुला जाडी म्हणालो म्हणून तू माझा अपमान केलास? तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी? ग्रो अप बेबी!”
“शट अप! तुम खुद को बहुत शाने समझते हो. पता नहीं मैं कैसे तुम्हारे झांसे में आ गयी. लेकिन इट इज इनफ. आजसे तुम्हारी मेरी फ्रेंडशिप खतम.”
“अरे जा जा! मला गरज नाही तुझ्या फ्रेन्डशिपची. भरपूर मैत्रिणी आहेत मला!
“मालुम है! खाना खिलाते हो इसलिए फ्रेंडशिप करती है वह तुमसे!
“असं? मग तू कशाला फ्रेंडशिप केलीस माझ्याशी? डेटिंग करायला? हाहाहा!
“शट अप! डेटिंग माय फूट!
“……”
“और इतने दिन चॅटिंग करते हुए क्या क्या लिखा तुमने! अब सबको दिखाती हूं! तुम्हारे दोस्तों को भी!”
“दाखव दाखव! सगळ्यांना दाखव! बघूया लोक कुणावर विश्वास ठेवतात! तुझ्यावर की माझ्यावर. मी काही वाईट लिहिलं नाही चॅटिंगमध्ये. आणि नीट लक्षात ठेव, तुझ्याबद्दल चांगलं बोलणारा मी एकटाच आहे आपल्या ग्रुपमध्ये. बाकी लोक काय काय बोलतात तुझ्याबद्दल हे माहीतच आहे तुला. तुझी एक मैत्रीण तर म्हणाली होती मला, सौ चुहे खाकर बिल्ली तुम्हारे पास आयी है…. मी ठेवला का तिच्यावर विश्वास? उलट तिला म्हणालो, तुमने कितने चूहे खाये है अबतक, वह पहले गिनो!”
“……”
“मग कधी दाखवतेस ते सगळं चॅट लोकांना? की मीच दाखवू सगळ्यांना?”
“तुमने चॅटिंग में फ्लर्टिंग किया मेरे साथ”
“मग काय झालं? त्यात मी कधी काही डर्टी लिहिलं का? माझं सगळं चॅट हेल्दी आहे. असं हेल्दी फ्लर्टिंग करणं ऐऱ्यागैऱ्याच काम नाही. इंग्लिश टीचर आहेस, तुला माझ्या फ्लर्टिंगचा उच्च दर्जा कळला नाही का? आणि मी इतके दिवस चॅट करतोय, तुला फ्लर्टिंग खटकत होतं तर त्याचवेळी मला का अडवलं नाहीस तू? मस्त एन्जॉय करत होतीस ते फ्लर्टिंग, हो ना?! हाहाहा”
“एन्जॉय माय फूट!”
“ए, काय सारखं माय फूट, माय फूट लावलं आहेस? तू फूट आता! बास झाले तुझे नखरे! यु आर टेकिंग मी ग्रांटेड. माझीच चूक झाली. मी तुझ्यावर एवढं प्रेम करायला नको होतं. तू एक निष्ठूर बाई आहेस. तुझ्या सगळ्या भावना मेलेल्या आहेत. तरी पण मी तुझे लाड केले. वाटलं होतं तुझ्या हृदयाला पाझर फुटेल कधी ना कधी! पण तू जास्तच इमोशनलेस बनत गेलीस. इतके दिवस सांभाळून घेतलं तुला, पण आता लई झालं. तुला रिलेशन्स तोडायची हौस आहे ना खूप? देन से मी गुड बाय!”
“……”
“गुडबाय म्हण बेबी, म्हणजे आपण दोघे आपापल्या वाटेनं जायला मोकळे होऊ.”
“……”
“गुडबाय म्हणतेस ना बेबी? की मी म्हणू?
“वाह वाह! और तुम तो कहते थे बार बार कि मैं तुमसे कभी दूर नहीं जाऊंगा, मैं तुम्हें नहीं छोडूंगा… वह सब एक नाटक ही था!”
“अरे नाही बेबी! ते नाटक नव्हतं. हे बघ बेबी, तुला गुडबाय म्हणवत नाही. मलाही म्हणवत नाही. तुला असं नाही वाटत का, आपली मैत्री कायम टिकावी? आपल्यात भांडणं होऊ नयेत ? एकमेकांच्या मदतीने आपण आपली प्रगती करावी?”
“आय एम सॉरी… मैं फिर कभी तुम्हारा इन्सल्ट नहीं करूंगी”
“अरे सॉरी कशाला म्हणतेस? चूक माझीच होती. तू फक्त रिऍक्ट झालीस. मीच तुला सॉरी म्हणतो.”
“फिर भी मैं सॉरी बोलती हूं”
“चल फिट्टम फाट झाली! मी तुझा इन्सल्ट केला म्हणून तू माझा इन्सल्ट केलास, आणि दोघंही एकमेकांना सॉरी म्हणालो!”
“येस!”
“पण बरं झालं आज आपलं भांडण झालं!”
“क्यों? ऐसा क्यों कहते हो!”
“अरे, एका नव्या कथेला विषय मिळाला!”
“हां! लिखो, जरूर लिखो!”
“चल, गुड नाईट, बाय! विल कॅच यू टुमारो!”
“गुड नाईट, बाय!”
“बेबी थांब थांब … “
“बोलो ..”
“एक रिक्वेस्ट आहे…”
“क्या..?”
“तू कधी कधी भांडत जा माझ्याशी…”
“नो बाबा नो… मैं अब कभी झगडा नहीं करूंगी तुमसे”
“अरे भांडत जा कधी कधी.. चेंज म्हणून. आपण कितीही भांडलो तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाही, तू भांडतेस तो किती थ्रिलिंग अनुभव असतो! आणि तू रागात असतेस तेव्हा किती सुंदर दिसतेस.. “
“हाहाहाहा… चलो बाय!”
“बाय!”
फ्रेंडशिपमधलं भांडण!
वाचण्यासारखं आणखी काही ……
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
One thought on “फ्रेंडशिपमधलं भांडण! Marathi Story”