नितीन जैन, पुणे
प्रेम एक असा शब्द आहे कि जो ऐकताच अंगावर रोमांच उभे रहातात. मोठमोठे लेखक, कवी, शायर वगैरेंनी आपापल्या शब्दांमध्ये प्रेमाची वेगवेगळी व्याख्या केली आहे. या प्रेमामध्ये असंही एक प्रेम आहे, जे आपण जीवनभर विसरू शकत नाही. ते म्हणजे पहिलं प्रेम.
हे वाचताच तुम्ही विचारात पडला असाल. तुमच्या मेंदूतून हॅप्पी हार्मोन्स वाहायला लागले असतील. तुमचा चेहरा प्रसन्न झाला असेल. कदाचित तुम्हाला गुद्गुल्याही होत असतील. तुम्ही तुमच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत रंगून गेला असाल.
पहिल्या प्रेमाविषयी इंग्रजीत एक कोट सांगितले जाते, ती म्हणजे First Love is Last Love!
काय असते हे पहिलं प्रेम? सकाळी जाग येताच डोळे उघडण्याच्या आधीच जिची आठवण येते, जिचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो, देवळात डोळे झाकून प्रार्थना करताना आपल्या शेजारी तीही उभी आहे असे वाटते, प्रार्थनेत आपण ‘तिचं भलं कर देवा’ असं म्हणतो, आज संध्याकाळी ती आपल्याला भेटणार आहे, आपल्या शेजारी बसून आपल्याशी गप्पा मारणार आहे याचा विचार येताच आपला दिवसाभरातील थकवा क्षणात नाहीसा होतो, ही पहिल्या प्रेमाची काही लक्षणे आहेत.
जिच्या मांडीवर डोके ठेऊन आराम करण्याची इच्छा होते, जिचं काही चुकत असलं तरी तिचा राग येत नाही, आला तरी तो आपण व्यक्त करत नाही, आणि हे व्यक्त करत असताना तुमच्या डोळ्यापुढे जिचा चेहरा आला असेल तेच तुमचं पहिलं प्रेम!
ज्यांनी कुणी म्हटलंय की ‘First Love is Last Love’, ते एकदम बरोबर आहे. जरी तुम्हाला नंतरही एखादं प्रेम झालं, तरी ते व्हायला खूप वर्षे लागू शकतात, आणि तरीही तुम्ही तुमचं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही.
नितीन जैन, पुणे हे एक कवी, शायर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मराठी आणि हिंदीमध्ये लिखाण करतात. |
हेही वाचा:
Marathi Short Story : अनबिलिव्हेबल दिशा…..
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
खूप छान लिहिलंय….. अगदी पहिलवहिलं प्रेम आठवावं इतकं सुरेख..!!! हा लेख मनात उतरला.
फारच सुंदर , प्रेमाची व्याख्या फारच मोजक्या शब्दात
खरच असे होते का ?
पहिले प्रेम म्हणजे एक आयुषभर न विसरणारी आठवण , शब्द नसतात व्यक्त करायला , फक्त दोन ठेम्ब अश्रु कोणाच्या तरी आठवण म्हणून
सीमा देशपांडे लिलियन
नई जर्सी
कधी कधी त्या पहिल्या प्रेमाची आठवण येते हया उतार वयात, आणि अबोल होऊन जातो मी , आज हा लेख वाचला आणि परत त्या आठवणीत रमुन गेलो मी आज . लेखक ला मानाचा मुजरा , US मधुन एका मित्रानी लिंक पाठवली व . शब्द संपले
लेखक ने अनुभव घेतला आहे , किवा त्यांचा प्रेम भंग झाला असावा ,
असो , सुरेख शब्द रचना , मला सुधा माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली , आयुष्याच्या 30 वर्ष साथ देऊन ती सोडून गेली देवा घरी कायमची .
फारच सुंदर , प्रेमाची व्याख्या फारच मोजक्या शब्दात सुंदर ……