Dr. Vijaykumar Shah
डॉ. विजयकुमार शाह हे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातले एक मोठं नाव. ते दूरदृष्टी असणारे, निस्वार्थ भावनेने काम करणारे, समाजसुधारक समाज सेवक आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1992 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांनी मिळवलेल्या काही प्रमुख पदव्या पुढीलप्रमाणे आहेत: बीडीएस (मुंबई), पीएचडी (युएसए), डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन डेंटल सर्जरी अँड कम्युनिटी हेल्थ, (युएसए), एफआरएसपीएच (लंडन), एफएसीडी (युएसए), डॉक्टर ऑफ नॅचरल मेडिसिन्स (कॅनडा), डॉक्टर ऑफ मेडिसिन (कोलंबो, श्रीलंका), एफआयएओएमएस (युएसए)…..
त्यांना मिळालेल्या डॉक्टरेट्स 70 हून अधिक आहेत, तर मिळालेल्या विविध पुरस्कारांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे.
ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंधित आहेत.
त्यांच्या आरोग्यविषयक आणि सामाजिक कार्याचं कौतुक मदर तेरेसा, इंदिरा गांधी, वसंत दादा पाटील, ज्ञानी झैल सिंग, राजीव गांधी, शंकरदयाळ शर्मा, पी व्ही नरसिंह राव, एच डी देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविद, द्रौपदी मुर्मू अशा अनेक मान्यवरांनी केलेलं आहे.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
डॉ. विजयकुमार शाह यांचा जन्म 22 जानेवारी 1940 रोजी जन्म सांगली येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सांगली येथे झाले. त्यांनी 1966 मध्ये नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज (मुंबई विद्यापीठ) येथून दंतचिकित्सेची पदवी पूर्ण केली आणि नंतर सांगलीला परत येऊन प्रॅक्टिस सुरु केली.
डॉ. विजयकुमार शाह यांचे मिशन विजय
1963 पासून डॉ. विजयकुमार शाह यांनी “मिशन विजय” नावाच्या व्यापक समाज कल्याण अभियानाचे आयोजन केले आहे.
आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच डॉ. विजयकुमार शाह यांचे समाजसेवेकडे विशेष आकर्षण होते. त्यांनी आरोग्य, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागरूकता, संरक्षण, साक्षरता प्रसार, लोकसंख्या नियंत्रण आणि राष्ट्रीय एकता यांसारख्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले. त्यांनी भारतातील 30 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांसह नेपाळ, भूतान, श्रीलंका, युएसए, रशिया, इस्रायल, जपान, इजिप्त, केनिया आणि युकेसह 80 देशांमध्ये आणि वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले.
राष्ट्रीय एकता आणि सांप्रदायिक सदभावना वाढविण्यासाठी त्यांनी अनेक रॅली, मॅरेथॉन, आणि मानवी साखळीचे आयोजन केले आहे. त्यांच्या “वृक्ष दिंडी” कार्यक्रमांतर्गत लाखो वृक्ष लागवड करण्यात आली आहे, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाला हातभार लागला आहे.
अनोखे कार्य
- त्यांनी भारतात 1966 मध्ये पहिल्यांदा पहिल्या प्रतिबंधात्मक मौखिक आरोग्य अभियानची सुरवात केली.
- 1983 त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांना महाराष्ट्रात विनाअनुदानित तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत अशी विनंती केली. वसंतदादा पाटील ही विनंती मान्य केली आणि अशी महाविद्यालये सुरु करण्याला शिक्षणसंस्थांना परवानगी दिली.
- डॉ. विजयकुमार शाह हे केंद्र सरकारचे केंद्र सरकारचे आरोग्य सल्लागार असताना प्रत्येक शालेय मुलाची वैद्यकीय तपासणी करावी हे सरकारला 1985 मध्ये सुचवले. सरकारने त्याची अंमलबजावणी केली.
- दंतचिकित्सेच्या क्षेत्रात डॉ. विजयकुमार शाह यांनी केलेलं काम असाधारण आहे. त्यांनी आजपर्यंत भारताच्या विविध भागात, विशेष करून ग्रामीण क्षेत्रात दंतचिकित्सा शिबिरे आयोजित केली आहेत आणि लाखो रुग्णांच्या मोफत डेंटल शस्त्रक्रिया केल्या आहेत.
- त्यांनी आजवर भारतातील 28,राज्ये आणि 9 केंद्र शासित प्रदेश, भारताच्या सर्व जिल्ह्यात आणि जगातील एक कोटी नऊ लाखाहून अधिक नागरिकांची सेवा केली आहे. भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि जगभरात अनेक देशात वैद्यकीय-सामाजिक कार्य करणारे ते एकमेव समाजसेवक आहेत.
डॉ. विजयकुमार शाह यांचे सांगली येथील शाह डेंटल हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख दंतचिकित्सा केंद्र आहे.
त्यांनी व्यसनमुक्ती, लोकसंख्या नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, आणि साक्षरता अभियानांना प्रोत्साहन दिले आहे.
कोविड महामारीच्या काळात डॉ. विजयकुमार शाह यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या अभियानांना चालू ठेवले. त्यांनी लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण केली आणि मोफत ऑनलाइन आरोग्य परामर्श सेवा प्रदान केली.
ते कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष आहेत, इतरही अनेक संस्थांचे पदाधिकारी आहेत.
त्यांनी आपल्या सामाजिक आणि मोफत वैद्यकीय कार्यासाठी कधीही सरकारी मदतीची मागणी केली नाही. त्यांचे कार्य प्रामुख्याने शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांच्यातुन तयार होणाऱ्या मनुष्यबळातून चालते.
डॉ. विजयकुमार शाह यांना फोटोग्राफीची आणि प्रवासाची आवड आहे. ते Bombay University Photographic Society चे संस्थापक आहेत.
वयाच्या 85 व्या वर्षीही त्यांचे कार्य अविरत चालू आहे.
डॉ. विजयकुमार शाह यांचे जीवन समाज आणि देशाच्या सेवेसाठी निस्वार्थ अर्पणाचे प्रतीक आहे. त्यांनी केलेल्या आणि करत असलेल्या कामातून सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ भावाने काम करण्याची प्रेरणा मिळते.
संपर्क तपशील
ई-मेल: drvijaykumarshah@hotmail.com
फोन: 9860991205
शाह डेंटल हॉस्पिटल
164, महावीर नगर
सांगली 416 416
फेसबुक: facebook.com/drvijaykumarshah
तुमचाही परिचय द्यावा …..
तुम्ही जर सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय क्षेत्रात काम करत असाल, किंवा तुम्ही एक यशस्वी उद्योजक, लेखक, कलाकार (अभिनेते, गायक, गीतकार, संगीतकार, डान्सर इत्यादी), खेळाडू असाल, किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात भरीव काम करत असाल, तर या वेबसाईवर तुमचा परिचय प्रकाशित करायला आम्हाला आवडेल. अधिक माहितीसाठी कृपया 8149128895 या नंबरवर फोन करावा अथवा WhatsApp मेसेज पाठवावा.
हेही वाचा:
TheyWon Marathi (मराठी लघुकथा, लेख आणि कविता)