महावीर सांगलीकर
दिशा विविध भारतीवर (दिशाची गोष्ट या दीर्घकथेतील एक भाग)
घरी आलो आणि डायरीत शुक्रवारच्या कार्यक्रमाची नोंद केली. त्यावेळी लक्षात आले की त्यादिवशी माझा वाढदिवस आहे. त्या कार्यक्रमाचा माझ्या वाढदिवसाशी कांही संबंध आहे का? की हा केवळ योगायोग आहे? दिशाला माझा वाढदिवस कधी असतो हे माहीत असण्याचे कारण नव्हते, तिने कधी तो विचारला नव्हता आणि मीही तो तिला सांगितला नव्हता. अगदी दहा वर्षांपूर्वी देखील. उद्या विचारूच तिला काय भानगड आहे ते.
दुसऱ्या दिवशी नेटवर चॅटिंग करत असताना मी तिला विचारले,
‘दिशा मला सांग, तुझा वाढदिवस कधी असतो’
‘1 डिसेंबर’
‘अजून खूप लांब आहे’
‘हो’
‘आणि तुझं जन्मसाल?
‘ते नाही सांगणार…… सध्यातरी’
‘तू माझा वाढदिवस कधी असतो ते विचारले नाहीस’
‘विचारायला कशाला पाहिजे? तो मला माहीत आहे’
‘तुला कसा काय माहीत?’
‘अहो तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्ति आहात. तुमच्याबद्दल बरीच माहिती इंटरनेटवर आहे. कुठेतरी तुमची जन्मतारीख असणारच की. इट इज सो इझी….’
‘म्हणजे माझ्याबद्दल इंटरनेटवरून तू बरीच माहिती गोळा केलेली दिसते’
‘फक्त इंटरनेटवरूनच नाही कांही…. आय हॅव मेनी ऑदर सोअर्सेस…’
‘माझ्या मागे डिटेक्टीव्ह तर सोडले नाहीस ना?’
‘नाही हो, जस्ट किडिंग…. आपके बारे में जानने के लिये सिर्फ इंटरनेट ही काफी है’
नंतर मी माझ्या रेडिओवर विविध भारतीचे मुंबई केद्र ऐकू येते का बघितले. ते फारच अस्पष्ट ऐकू येत होते. शिवाय खरखरत होते. मग मी रेडिओ घेऊन आमच्या बिल्डींगच्या टेरेसवर गेलो. तिथे ते स्टेशन लाऊन बघितले तर ते अगदी क्लिअर नाही, पण बऱ्यापैकी ऐकू येत होते.
दिशा विविध भारतीवर
शुक्रवार उजाडला. मी रेडीओमध्ये नवे सेल घातले. दुपारी 2.55ला टेरेसवर गेलो. रेडीओ सुरू केला. बरोबर तीन वाजता पुढील शब्द ऐकू आले:
‘यह विविध भारती का मुंबई केंद्र है. अब आप सुनने जा रहे है हमारा अगला कार्यक्रम मेरी पसंद. आज के इस प्रोग्रॅम में आप सुनेंगे प्रसिद्ध लेखिका दिशा कोठारी की पसंद के गीत’
मग एक आवाज आला, ‘हाय एंड हॅलो एव्हरी बडी… धिस इस दिशा…… पुणे में मेरा एक खास दोस्त है.. महावीर है उसका नाम. आज उसका जन्मदिन है. सबसे पहले मैं मेरे प्यारे दोस्त महावीर को Happy Birth Day कहना चाहुंगी. मेरी पसंद के जो गीत आज आप सुनने जा रहें हैं, वे सारे गीत खास मेरे इसी दोस्त के नाम है. …..
हाय महावीर, सून रहे हो ना?
मग एक गाणं सुरू झाले….
तुम जियो हजारो साल…..
तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार
तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार
तुम जियो हजारो साल
साल के दिन हो पचास हजार
सुरज रोज आता रहें
रोज गाता रहें
लेके किरणों के मेले
पलछिन गिन गिन तेरा हर दिन
तब तक रंगों से खेले
रंग जब तक बाकी है बहारो में

दिशा विविध भारतीवर
हे गाणे संपल्यावर दिशा म्हणाली, ‘जब भी मुझे मेरे इस प्यारे दोस्त की याद आती है, तो मुझे याद आता है यह गीत….’
तेरा मुझसे है पहले का नाता कोई…..
तेरा मुझसे है पहले का नाता कोई…..
यूंही नही दिल लुभाता कोई….
जाने तू… या जाने ना
माने तू…. या माने ना
या दोन गाण्यानंतर दिशानं ‘मुझे तुमसे प्यार कितना, यह तुम नही जानते……मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना’, ‘मान जाईये, मान जाईये, बात मेरे दिल की जान जाईये…’ ही दोन गाणी वाजवली. मग म्हणाली,
‘अब आप सुनिये मेरी पसंद का आखरी गीत…..’. आणि मग पुढील गाणे वाजू लागले….
मैं तो कब से खडी इस पार….
मैं तो कब से खडी इस पार
ये अखियां थक गई पंथ निहार
आ जा रे……….
मैं दिए की ऐसी बाती
जल ना सकी जो बुझ भी ना पाती
आ मिल मेरे जीवन साथी
तुम संग जनम जन्मा के फेरे
भूल गए क्यों साजन मेरे
आ जा रे……….
‘आय होप मेरा दोस्त मेरे दिल की बात को समझ गया होगा..’
हा कार्यक्रम ऐकताना आपण नक्कीच आभासी जगात वावरत आहोत असं मला वाटायला लागलं. आपल्याला होतात ते भास नसून वास्तव आहे असं म्हणावं तर दिशाला आपण इतके का आवडतो, याचं उत्तर मला मिळत नव्हतं. की यामागं वेगळेच कांहीतरी आहे?
दिशानं वाजवलेली ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…..’ आणि ‘मैं तो कब से खडी इस पार’ ही दोन गाणी मला गूढ वाटली, आणि थोडी भयसूचकही. तिनं ती का वाजवली असतील हे मला कळेना.
दिशा विविध भारतीवर
दिशामुळं आपल्याला आनंद मिळत असला तरी तिचं जरा अतीच चालले आहे. ती वेडी मुलगी असावी असं म्हणावं तर तसं कोणतंही लक्षण तिच्या बोलण्यात, लिहिण्यात दिसत नव्हतं. आपण तिच्याशी पहिल्यापासून हात राखूनच वागत आलो हे ठीकच केलं. पण आपण तिच्या प्रेमात गुरफटून गेलो आहोत. याच्यातून बाहेर कसं पडायचं ? आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पण घाई नको, नाहीतर भलतंच कांही तरी व्हायचं.
त्यादिवशी मी तिला कांही फोन केला नाही. तिला राग आला असेल, पण मनात म्हणालो, येऊ दे.
दिशाचा वाढदिवस
रात्री मला झोप येईना. अचानक मनात आलं, आपण दिशाचे न्यूमरॉलॉजीकल रीडिंग करावे. कदाचित आपल्याला त्यातून कांहीतरी गवसेल. मी एक कागद आणि पेन घेवून कॅलक्यूलेशन्स सुरू केली. तिनं तिची जन्मतारीख 1 डिसेंबर सांगितली होती. 1 तारीख म्हणजे बर्थ नंबर 1, म्हणजे ऍटिट्यूड नंबर 4. तरीच.. एकाचा बर्थ नंबर दुसऱ्याचा ऍटिट्यूड नंबर असेल तर त्यांचं चांगलंच अटॅचमेंट होत असतं.
पण याच्याही पलीकडे कांही आहे का?
तिनं तिचं जन्मसाल नाही सांगितलं. सांगणारही नाही म्हणाली. तेंव्हा आता आपल्यालाच शोध घ्यावा लागेल. तिचं जन्मसाल 1970 ते 1972 च्या दरम्यान असावं असा आपण अंदाज केलाच आहे. पण यातलं नेमकं कोणतं साल असावं? तिच्या स्वभावावरून, तिच्या वागण्यावरून, विचार करण्याच्या पद्धतीवरून तिचा लाईफ पाथ नंबर 3 असायला पाहिजे. म्हणजे तिची पूर्ण जन्मतारीख 1.12.1970 हीच आहे… या तारखेतील अंकांची बेरीज 21 येते… म्हणजे लाईफ पाथ नंबर ३. अरे हे काय … माझाही लाईफ पाथ नंबर 3 आहे. आणि माझा बर्थ नंबर 4 आहे तर तिचा ऍटिट्यूड नंबर 4 आहे. म्हणजे 4 आणि 3 हे अंक दोघांमध्येही कॉमन आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी आश्चर्यकारक होती.आहे. म्हणजे 4 आणि 3 हे अंक दोघांमध्येही कॉमन आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी आश्चर्यकारक होती.
अरेरे! हे 4-3 कॉम्बिनेशन …. दिशाचं लग्न नाही होणार बहुतेक… झालं तरी ते टिकणार नाही.
मला थोडं वाईट वाटलं.
प्यार किया तो डरना क्या… प्यार किया कोई चोरी नहीं….
दुसऱ्या दिवशी मी नेहमी प्रमाणं सायबर कॅफेत गेलो. मेसेंजरमध्ये लॉग इन केलं. दिशा कांही दिसली नाही. मग मी माझी इतर कामं करत बसलो. तेवढ्यात दिशा ऑनलाईन आली. आपण मेसेज पाठवावा की तिच्याकडून मेसेज यायची वाट पहावी याचा विचार करत होतो. इतक्यात तिचा मेसेज आला….
‘मग कसा काय वाटला कालचा विविध भारतीवरील प्रोग्रॅम?’
तिची फिरकी घेण्यासाठी मी म्हणालो, ‘सॉंरी दिशा, काल मला तो प्रोग्रॅम ऐकायला जमलं नाही..’
‘मुझसे झूठ मत बोलो… काल तुम्ही तो प्रोग्रॅम ऐकला… टेरेसवर जावून…’
दिशाचं हे वाक्य वाचून मी मनात चरकलो. … हे आहे तरी काय? तिला या गोष्टी कशा काय कळतात….?
‘सॉंरी मॅडम, आय वाज जस्ट किडिंग…. ऐकला मी तो प्रोग्रॅम .. छान होता. पण मला सांग मी तो टेरेसवर जावून ऐकला हे तुला कसं काय कळलं?’
‘इट इज अ युज ऑफ कॉमन सेन्स. पुण्यात विविध भारतीचे मुंबई केंद्र नीट ऐकू येत नाही… त्यासाठी तुम्हाला उंचावर जावे लागणार.. टेरेस त्यासाठी सोयीस्कर.. मग तुम्ही टेरेसवरच जाणार… सो सिंपल…….’
या बयेने शेरलॉक होम्स वाचलेला दिसतोय, मी मनात म्हणालो.
‘ते ठीक आहे, पण मी तो प्रोग्रॅम ऐकलाच असेल याची तुला कशी काय खात्री?’
‘अपने आपसे पुछो महावीरजी, क्या आप मेरी बात को टाल सकते हो?’
‘दिशा, तुझं प्रेम जरा जास्तच उतू चाललेय… हे जरा अतीच वाटतेय…….प्रेमाचं जाहीर प्रदर्शन कशाला केलंस, रेडिओवर?’
‘प्यार किया तो डरना क्या… प्यार किया कोई चोरी नहीं…..’
‘परत सुरू झाला का तुझा प्रोग्रॅम….. आपण नंतर बोलू भरपूर रात्री फोनवर.. मला आता काम करू दे थोडं’ असं म्हणत मी मेसेंजर मधून लॉग आउट झालो
-पुढे चालू:
दिशाची गोष्टीमधल्या कथा:
पत्रमैत्रिण | Pen Friend (भाग 2)
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!