डिंपल ओसवाल यांची TheyWon च्या मुख्य संपादिका म्हणून नियुक्ती

03.01.2024

पुणे: येथील डिम्पल पारसमल ओसवाल यांची दे वन (TheyWon) या इंग्रजी ऑनलाईन मॅगझिनच्या मुख्य संपादकपदी निवड झाली आहे.

डिम्पल ओसवाल यांच्यावर संपादकीय धोरणे ठरवणे, दे वनच्या संपादकीय टीमला मार्गदर्शन करणे आणि नवीन लेखकांना हेरून त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणे या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

दे वन हे नव्याने सुरु झालेले ऑनलाईन इंग्रजी मॅगझिन आहे. या मॅगझिनचा मुख्य उद्देश प्रतिभावान नवलेखकांना इंग्रजी कथा, लेख, प्रवास वर्णन आदी लिहिण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना संधी देणे हा आहे.

डिम्पल ओसवाल या एक लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, गायिका, वक्त्या, शिक्षिका, मोटिव्हेटर आणि सामाजिक दबदबा निर्माण करणाऱ्या पुणेकर महिला आहेत. त्यांच्याकडे अद्भुत संवादकौशल्य आहे आणि त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे.

डिम्पल ओसवाल

Mahavir Shrimandhar Chavan
Managing Director, TheyWon
www.theywon.in
email: MD@theywon.in
Phone: 91 8149128895

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *