© महावीर सांगलीकर
किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात? पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण पहिल्यांदाच आलो आहोत….. विचारांच्या या तंद्रीतच मी त्या किल्ल्याच्या बाहेर पडलो. गावात जाणारा रस्ता ओळखीचा वाटत होता. त्या रस्त्यावरून मी गावात शिरलो. एका जुन्या हवेलीसमोर माझी पाउलं थांबली. दरवाजावर ‘राठोड हाऊस’ असं लिहिलं होतं. मी दरवाजा हळूच ढकलत हवेलीत शिरलो. तिथं कोणीच दिसत नव्हतं. जरा आत गेलो तर सोप्यात एका कडेला एक छोटी मुलगी कॉम्प्यूटरसमोर आपल्या कामात मग्न होऊन बसली होती.
माझी चाहूल लागताच ती माझ्याकडं न बघताच जोरात म्हणाली, ‘बडी दादी, महावीर अंकल आये हैं….’
मला आश्चर्याचा धक्का बसला. या मुलीला माझं नाव कसं काय माहीत?
थोड्याच वेळात आतून एक आजीबाई बाहेर आल्या. वय ऐंशीच्या वर असावं. माझ्याकडं निरखून बघायला लागल्या. तो चेहरा माझ्या ओळखीचा वाटत होता, पण मी त्यांना कुठं बघितलं होतं ते आठवेना. एवढ्यात त्या म्हणाल्या, ‘महावीर, आखीर आ ही गये तुम.’ त्यांनाही माझं नावं माहीत होतं!
त्यांच्या चेहऱ्यावर मी खूप दिवसांनी भेटल्याचे भाव होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. ‘जुग जुग जियो बेटा’ असं त्या पुटपुटल्या. मग एका खुर्चीकडं बोट दाखवत म्हणाल्या, ‘बैठो बेटा .. तब तक मैं तुम्हारे लिये कुछ लाती हूं’. मग त्या मुलीकडं बघत म्हणाल्या, ‘सलोनी, कॉम्प्यूटर बंद करो और अंकल से बातें करो’ आणि परत आत गेल्या.
सलोनीनं कॉम्प्यूटर कांही बंद केला नाही, ती तिच्याच नादात होती. मी तिला हाक मारली,
‘सलोनी बेटा, कौन सा गेम खेल रही हो?’
‘मैं गेम नहीं खेलती’ तिनं माझ्याकडं न बघताच उत्तर दिलं.
‘फिर क्या कर रही हो?’
‘मैं एक प्रोग्रॅम बना रही हूं’
सलोनीचं हे उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटलं. तिचं वय फार तर सात वर्षे असावं. या वयात ही प्रोग्रॅम बनवते? खात्री करून घेण्यासाठी मी विचालं, ‘तुम कौनसी क्लास में पढती हो बेटा?’
‘सेवंथ स्टॅंडर्ड’ तिनं उत्तर दिलं.
तिच्या या उत्तरानं मला आश्चर्याचा धक्का बसला. असं कसं शक्य आहे? की ही मुलगी तिच्या वयापेक्षा छोटी दिसते?
‘तुम्हारी उम्र सात साल है ना?’
‘हां….’
‘फिर तुम सेवंथ स्टॅंडर्ड में कैसे?’
‘स्पेशल केस’
तिच्या या नेमक्या उत्तराचं मला कौतुक वाटलं.
‘कौन सी स्कूल में पढती हो?’
‘डून स्कूल‘
‘ग्रेट…. अच्छा, मुझे यह बताओ बडी होकर तुम क्या करोगी?’
‘मैं फायटर पायलट बनूंगी’
‘ग्रेट…. तुम्हारे पप्पा कहां हैं?’
‘पप्पा नहीं हैं’
‘नहीं हैं मतलब?’
‘उनका प्लेन गिर गया’
‘अरेरे… आय एम सॉरी टू हिअर इट’
विषयांतर करण्यासाठी मी म्हणालो, ‘तुम टी.वी. देखती हो?’
‘कभी कभी’
‘डोरेमॉन?’
‘वह तो बच्चों के लिये होता है’
मला तिच्या या उत्तराचं हसू आलं.
‘फिर तुम टी.वी. पर क्या देखती हो?’
‘नॅशनल जिओग्राफिक….. हिस्टरी चॅनल ..’
एव्हाना ती छोटी मुलगी ‘सुपर जिनिअस’ आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. मग मी तिला म्हणालो, ‘मुझसे दोस्ती करोगी?’
आत्तापर्यंत माझ्याकडं न बघताच ती माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होती, पण माझ्या या प्रश्नावर तिनं मागं वळून बघितलं, मला न्याहाळलं आणि नंतर नकारार्थी मान हलवली. मी हसून विचारलं, ‘क्यों?’
‘क्यों कि आप दोस्ती नहीं निभाते’
‘यह तुम्हें किसने बताया?’
‘बताने की क्या जरूरत है? आपके चेहरे पर जो लिखा है’
‘मतलब तुम फेस रीडिंग जानती हो?’
‘याह…’
‘और क्या जानती हो?’
‘आपकी बर्थ डेट 22 है’
‘कमाल है… यह कैसे जानती हो… ’
‘मैं भी न्यूमरॉलॉजी जानती हूं…’
‘मैं भी का मतलब…? तुम्हे कैसे मालूम कि मैं न्यूमरॉलॉजी जानता हूं? और तुम मेरा नाम कैसे जानती हो?’
‘अंकल प्लीज मुझे काम करने दो, हम बाद में बातें करेंगे. आपको यहां और कई दिन रहना है. धीरे धीरे आपके सभी सवालों का जबाब मिल जायेगा आपको… और मेरे बारे में आप बहोत कुछ जान जाओगे’ असं म्हणत ती पुन्हा आपल्या कामात गर्क झाली.
‘आपको यहां और कई दिन रहना है’ असं तिनं का म्हंटलं असावं बरं? आपण तर चुकून या हवेलीत आलोय, हे लोक तर आपल्या ओळखीचे पण नाहीत. यांना माझं नाव कसं काय माहीत आहे? हा विचार करतच मी इकडं तिकडं बघू लागलो. सोप्याच्या दुसऱ्या कडेला पुस्तकाचं एक मोठं कपाट दिसलं. मी उठून त्या कपाटाजवळ गेलो. कपाटात गूढविद्या, टेलेपथी, न्यूमरॉलॉजी, फेस रीडिंग, बॉडी लॅन्ग्वेज, हिप्नॉटिझ्म अशा विषयांची पुस्तकं दिसत होती.
ही पोरगी असली पुस्तकं वाचते? या वयात? की हे कपाट तिचं नाही? एकाच वेळी असे अनेक प्रश्न मला पडले.
मी विचारलं, ‘यह किताबें पप्पा की हैं ना?’
‘नहीं अंकल, मैंने लायी हैं मेरे लिये….. ‘
तेवढ्यात मला त्या कपाटात न्यूमरॉलॉजीवरचं एक जाडजूड इंग्रजी पुस्तक दिसलं. कपाट उघडून मी ते पुस्तक हातात घेतलं. “Advanced Numerology with Special Reference to Face Reading” असं त्या पुस्तकाचं नाव होतं. त्या पुस्तकावरील लेखकाचं नाव वाचून माझे डोळे विस्फारले, मी चक्क आ वासला! ते पुस्तक चक्क सलोनीनं लिहिलेलं होते. सलोनी राठोड. खात्री करून घेण्यासाठी मी बॅक कव्हर बघितलं, तर तिथं सलोनीचा फोटो होताच.
ही सगळी काय भानगड आहे? आपण स्वप्नात तर नाही ना? नाहीतरी अलीकडं आपल्याला अशी गूढ स्वप्नं पडतच असतात. मी माझा कान पिरगाळून पाहिला, गाल ओढून पाहिला. हाताला चिमटा घेवून पाहिला. हे स्वप्न नव्हतं याची खात्री झाली. तरीपण आणखी एक प्रयोग करून बघितला, तो म्हणजे अंगणात गेलो आणि तिथं असलेली शिडी चढलो. मग उतरलो. नक्कीच हे स्वप्न नव्हतं.
तेवढ्यात सलोनीनं हाक मारली, ‘अंकल, बडी दादी बुला रही है..’
मी परत सोप्यात गेलो. तेवढ्यात आजीबाई बाहेर आल्या. म्हणाल्या, ‘चलो बेटा कुछ खा लो’
मी त्यांच्या मागोमाग घरात गेलो. ….
महावीर सांगलीकर हे सिनिअर न्यूमरॉलॉजिस्ट, मेंटॉर, मोटिव्हेटर, आणि कथालेखक आहेत. |
लेख, कथा:
धर्म आणि विज्ञान | Religion and Science
रामराज्य म्हणजे नक्की काय रे भाऊ….!
जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage
नावात काय आहे? नावात बरंच कांही आहे! What is in the Name?
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
Fantastic Suspense Story .Buck up Mahavirajee
पुढे काय ..?