Advocate Ramesh Umarge: A Multi-Dimensional Personality
ऍडव्होकेट रमेश उमरगे यांचे व्यक्तिमत्व आणि जीवन तुम्हाला प्रेरणादायक ठरेल असे आहे.
रमेश उमरगे यांचा जन्म 1955 मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्यांचे मामा अण्णाराव रोडगे यांच्याकडे झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर रमेश उमरगे महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजू झाले.
पोलीस सेवेत असताना रमेश उमरगे यांनी विविध विभागात विविध पदावर आपले कर्तव्य पार पाडले. त्यातील महत्वाचे विभाग म्हणजे पासपोर्ट विभाग आणि सी. आय. डी.
पोलीस सेवेत असताना चिंचवड येथे यांनी कौटुंबिक समुपदेशक म्हणून काम केले आणि 300 प्रकरणात पतिपत्नीमध्ये समझोता घडवून आणला, एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ दिले नाहीत. हुंडाबळी होऊ दिले नाहीत
विशेष म्हणजे पोलीस सेवेत असतानाच त्यांनी सिम्बॉयसिस कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.
त्यांना बढती मिळत गेली आणि 2013 मध्ये ते गुप्तवार्ता अधिकारी बनले आणि मग निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर……
सर्वसाधारणपणे असे दिसून येते की निवृत्तीनंतर अनेक लोक काही विशेष असे, आगळे वेगळे जीवन जगत नाहीत. पण काही अपवादात्मक लोक निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेचा स्वतः साठी आणि इतरांसाठी सदुपयोग करतात. ऍडव्होकेट रमेश उमरगे हे अशांपैकीच एक.
निवृत्तीनंतर ऍडव्होकेट रमेश उमरगे यांनी बालन्यायालयात (ज्युव्हेनाईल कोर्ट) सेवा दिली. पुण्यात मेट्रो प्रोजेक्टवर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून दोन वर्षे सेवा दिली, एका लॉ फार्म मध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून काम केले. हे करत असतानाच त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) ची पदवी मिळवली!
सध्या ते राष्ट्रीय लोक अदालत शिवाजीनगर (पुणे) येथे पॅनल न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्यांच्या गावी असलेली त्यांची शेतीही सांभाळतात.
धार्मिक, आध्यात्मिक आणि साहित्यिकही!
ऍडव्होकेट रमेश उमरगे हे धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्ती आहेत. ते एक स्पिरिच्युअल हीलर आहेत. त्यांनी स्पिरिच्युअल हीलिंग करण्यासाठी ‘ऊर्जा क्रिया’ ही आगळी वेगळी पद्धत विकसित केली आहे. ऊर्जा क्रियेमुळे मानसिक ताण-तणावापासून मुक्ती मिळते. ऍडव्होकेट उमरगे यांनी या क्रियेचा लाभ सामान्य लोकांबरोबरच 300 हून अधिक मान्यवरांनाही दिला आहे.
त्यांचा शैव, जैन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचा चांगला अभ्यास आहे. त्यांचा संतसाहित्याचा, विशेषतः संत बसवेश्वर, कबीर आणि संत तुकाराम यांच्या साहित्याचा अभ्यास आहे. ते स्वतः एक साहित्यिक आहेत, कवी आहेत. त्यांचे ‘यह रंग है निराला’ हे आत्मचरित्र वाचकप्रिय झालेले आहे. हिंदी-उर्दू शेर शायरीवर त्यांचे प्रभुत्व आहे.
ऍडव्होकेट रमेश उमरगे हे शाकाहारी आहेत, आणि शाकाहारी जीवनशैलीचा प्रचारही करतात. शिवाय ते पूर्णपणे निर्व्यसनी आहेत, अगदी सुपारीच्या खांडाचेही त्यांना व्यसन नाही.
लोकसंग्रह
ऍडव्होकेट रमेश उमरगे यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे. त्यांच्याकडे विलक्षण संवाद कौशल्य आहे. समाजातील सर्व थरात, सर्व धर्मियांमध्ये, सरकार-दरबारात, साहित्य क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात त्यांनी हजारो मित्र जोडले आहेत. परिचित लोकांमध्ये ते अण्णा या नावाने ओळखले जातात.
पुरस्कार
ऍडव्होकेट रमेश उमरगे यांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या भरीव कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामधले काही उल्लेखनीय पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत:
● न्यायदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. मणिभाई देसाई राष्ट्र सेवा पुरस्कार
● विश्वकल्याण मानव सेवा संस्था देहूकडून जगतगुरु संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार
● पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली कडून सन्मानपत्र
● भाग्योदय लेखणीचा या साहित्य मंचाकडून राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार
● मन्मथ माउली या संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार
संपर्क तपशील
ई-मेल: adv.rsumarge@gmail.com
फोन: 91 9552562586
तुमचाही परिचय द्यावा …..
तुम्ही जर सामाजिक, शैक्षणिक अथवा राजकीय क्षेत्रात काम करत असाल, किंवा तुम्ही एक यशस्वी उद्योजक, लेखक, कलाकार (अभिनेते, गायक, गीतकार, संगीतकार, डान्सर इत्यादी), खेळाडू असाल, किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात भरीव काम करत असाल, तर या वेबसाईवर तुमचा परिचय प्रकाशित करायला आम्हाला आवडेल. अधिक माहितीसाठी कृपया 8149128895 या नंबरवर फोन करावा अथवा WhatsApp मेसेज पाठवावा.
TheyWon Marathi (मराठी लघुकथा, लेख आणि कविता)