गौरी आणि फेस रीडर | Gauri

महावीर सांगलीकर

गौरी आणि फेस रीडर मराठी लघुकथा:

गौरी, तू इतकी उदास का रहातेस? चेहरा जरा प्रसन्न ठेवत जा ना… बरं वाटतं लोकांना हसरे चेहरे बघायला…
गौरीची आजी नेहमी तिला हे सांगत असे. पण असलं कुणी कांही सांगितलं की गौरीचा चेहरा आणखीनच उदास होत असे.

कॉलेजमधली टपोरी पोरं तिला चिडवायची. मैत्रिणी देखील चिडवायच्या.

खर म्हणजे ती एक जिनिअस मुलगी होती. बुद्धिमत्तेची तुलना केली तर तिच्यापुढं तिच्या वर्गातली मुलं-मुली कांहीच नव्हती. त्यांचं तर जाउद्या, प्राध्यापक मंडळीही तिला बिचकून असत. न जाणो तिनं कांहीतरी प्रश्न किंवा शंका विचारली आणि प्राध्यापकाकडं उत्तर नसलं की त्याची फजिती होत असे. तो ‘तुझा प्रश्न चांगला आहे, पण मी त्याचे उत्तर उद्या देईन’, किंवा ‘तू नंतरभेट’ असं कांहीतरी सांगून तिचा प्रश्न टाळत असे. मग गौरी स्वत:च त्या प्रश्नाचंउत्तर देत असे. वर्गातली मुले-मुली खुश होत असत, सरांची फजिती झाली म्हणून…

पण तीच मुले, त्याच मुली संधी मिळताच तिला चिडवत असत. त्यांच्या चिडवण्याचं तिला फार वाईट वाटत असे.

‘ए, ती काळी आली बघ…’ ‘किती गं तुझा रंग काळा’ ‘कालिका माता’… ‘नाव गौरी, आणि….’ ….आणखी काय काय…..

हळूहळू तिच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड तयार व्हायला लागला.

तिनं शिक्षण पूर्ण केलं. तिला एक चांगला जॉबही मिळाला. मग घरचे तिच्यासाठी मुलगा शोधू लागले.
एक मुलगा तिला पहायला आला. तो दिसायला एवढा कांही चांगला नव्हता, त्याला पगारही गौरीपेक्षा कमीच होता. पण त्या मुलानं गौरीला रिजेक्ट केलं. त्याला गौरी नाही, गोरी पाहिजे होती.

गौरी आणि फेस रीडर

कांही दिवसांनी आणखी एक मुलगा गौरीला बघायला आला. त्यानंही गौरीला रिजेक्ट केलं. कारण पुन्हा तेच.

असाच प्रकार तिसऱ्यांदा घडला. मग मात्र गौरी जिद्दीला पेटली. तिनं आपण लग्नच करायचं नाही असं मनात ठरवलं.

मग आणखी एक मुलगा तिला बघायला आला. तोही सो-सोच होता.

गौरीनं त्या मुलाच्या समोरच आपल्या आईला सांगितलं, मला हा मुलगा पसंत नाही. सगळे अवाक झाले. मुलानं, त्याच्या बरोबर आलेल्या मंडळींनी काढता पाय घेतला. ते लोक गेल्यावर गौरीची आई तिला खूप बोलली. गौरीनं ठामपणे सांगितलं, मी आत्ताच लग्न करणार नाही. मला अजून शिकायचं आहे.

शिकत असतानाच तिला एका कंपनीत जॉब मिळाला. पुढं जॉब करता-करताच ती एम.बी.ए. झाली. तिचं काम बघून तिला प्रमोशन देण्यात आलं. नंतर तिच्या कंपनीनं तिला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं. तिचा पासपोर्ट तयार होताच. व्हिसाही मिळाला.

लवकरच कंपनीच्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये ती जॉईन झाली.

तिच्या घरचे लोक पुन्हा तिच्या लग्नाचा विषय काढू लागले. तिनं घरी फोन केला की हाच विषय निघत असे. पण ती लग्न करण्यास इच्छुक नव्हती. आपण पुन्हा नाकारले जावू अशी भीती तिला वाटायची.

अशा वातावरणात फेसबुकवर तिला एक व्यक्ति दिसली. त्या व्यक्तीचे प्रोफाईल बघून तिनं त्याला फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. त्यानं ती रिक्वेस्ट स्वीकारली.

तो एक फेस रीडर होता. इंडियातला. पुण्याचा..

तिनं त्याला मेसेज पाठवला… थँक यू फॉर बिकमिंग माय फ्रेंड.
त्याचं उत्तर आलं… इट्स माय प्लेजर टू बी युअर फ्रेंड… यु आर वेलकम!

त्यांची दोस्ती वाढत गेली. तिला त्याच्याबद्दल फारच आपुलकी आणि विश्वास वाटू लागला.

एके दिवशी त्यानं तिला विचारलं… ‘मी आज तुझे फोटो चेक केले.. तुझ्या फेसबुक अकाउंटवरचे… तू इतकी उदास का असतेस?’

तिनं सांगितले, ‘मी काळी-सावळी आहे. मला माझ्या काळेपणाची लाज वाटते. माझं लग्न होत नाही. बघायला येणारे मला रिजेक्ट करतात… म्हणून मी दु:खी आहे’

‘वेल’, तो फेस रीडर म्हणाला, ‘तू मला तुझे क्लीअर फोटो पाठव. जेवढे पाठवता येतील तेवढे… क्लोज अप, पूर्ण साईझ मधले, समोरून काढलेले, साईड पोज.. आणि मेन म्हणजे विदाउट मेकअपचे. मग बघ मी तुला कसं मस्त सोल्यूशन देतो ते…’

तिनं लगेच त्याला तिचे अनेक फोटो पाठवून दिले.

फेसरीडरने तिच्या त्या फोटोंचे ओझरतं निरीक्षण केलं. मग तिला कांही प्रश्न विचारले.
‘तुझ्या चेहऱ्यावर डाव्या डोळ्यांच्या खाली दोन तीळ दिसतात. आहेत का? फोटोत नीट दिसत नाहीत म्हणून विचारलं …’
‘हो आहेत’
‘चेहऱ्यावर आणखी कोठे तीळ आहेत?’
‘उजव्या भुवयीच्या आत दोन तीळ आहेत’
‘तुझ्या हनुवटीवर खळी दिसते..’
‘होय’
‘आणखी कुठं खळी पडते काय?’
‘डाव्या गालावर’
‘छान… तू खूप सुंदर दिसतेस..’
‘पण मी काळी आहे..’
‘मग काय झाले? काळी मुलगी सुंदर नसते काय? आजपर्यंत मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा खूप वेळा काळ्या तरुणींनी जिंकली आहे’
‘हो, माहीत आहे. पण भारतात गोरं असणं म्हणजे सुंदर असणं असं मानतात’
‘फरगेट अबाउट इंडिया एंड इंडियन्स … त्यांच्यावर गोऱ्या लोकांनी दीडशे वर्षे राज्य केलं, म्हणून त्यांना तसं वाटतं. काळ्या लोकांनी राज्य केल असतं तर ते लोक आणखीन काळं व्हायला धडपडले असते’
‘हा हा हा… यु आर राईट’
‘मग इंडियात ‘कालेपण की क्रीम’ खपली असती’
‘हेहेहेहे….’
‘हे बघ तू किती सुंदर आहेस याची तुला अजिबात कल्पना नाही’
‘…………’
‘वुईथ युवर काइंड परमिशन, मला तुझ्या सौंदर्याचे वर्णन करायचं आहे. …’
‘……….’
‘चालेल का?
‘यस डिअर’
‘ओके… आता मी जे कांही सांगेन, ते लक्षपूर्वक ऐकायचं… मी जे बोलेन त्याला प्रतिसाद द्यायचा…
विषय डायव्हर्ट करायचा नाही… समजलं?’
‘हो’
‘रेडी?’
‘यस, आय एम रेडी…’

गौरी आणि फेस रीडर

‘ओके… हे बघ, आत्ता माझ्यासमोर स्क्रीनवर तुझे अनेक फोटो आहेत.. तू खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतेस’
‘खरंच?’
‘होय.. मी खोटं बोलत नसतो… तुला माहीत आहे सौंदर्याचा पहिलं लक्षण काय आहे ते?’
‘नाही’
‘शेप.. तुझा शेप फारच आकर्षक आहे…. तू स्लीम आहेस. फारच थोड्या मुलींच्या वाट्याला असा आकर्षक शेप येत असतो’
‘थॅंक्स…’
‘तुझ्या शेपला मी किती मार्क देत आहे ठाऊक आहे?’
‘किती?’
‘शंभर पैकी शंभर’
‘ओह… थॅंक यू डिअर.. पुढे…’
‘सौन्दर्याचं दुसर लक्षण… उंच, लांब मान.. तुझी मान तशीच आहे… त्यामुळे तू आणखीनच सुंदर दिसतेस’
‘किती मार्क?’
‘तुला किती पाहिजेत?’
‘जज तुम्ही आहात… तुम्हीच सांगा’
‘ओके. इथंही तुला पुन्हा शंभर पैकी शंभर मार्क पडले’
‘ओह, हाऊ स्वीट…’
‘आता तुझा चेहरा..’
‘तो कसा दिसतो…?’
‘तिथं एक प्रॉब्लेम आहे’
‘का… काय झालं?’
‘तुझा चेहरा फार सिरिअस दिसतो…. जर मिस सिरिअस स्पर्धा घेतली तर तुला पहिलं बक्षीस मिळेल त्या स्पर्धेत’
‘हाहाहाहा’
‘तशी तू खूप सुंदर दिसतेस…. चेहऱ्यावर हसू ठेवलेस, चेहरा प्रसन्न ठेवलास तर आणखीनच सुंदर दिसशील’
‘आजपासून मी चेहरा हसरा ठेवेन’
‘आजपासून नको… आत्ता पासूनच… शुभ काम में देरी क्यों?’
‘ओके…’
‘तुझा चेहरा… किती आखीव रेखीव आहे..’
‘…….’
‘सरळ, लांब नाक… गहरे काळे डोळे… विशाल कपाळ… गालावर खळी…. नाजूक ओठ.. आणखी काय पाहिजे…?’
‘तुम्ही मला लाजवत आहात….’
‘लाज की मग…आणखीन सुंदर दिसशील…’
‘…. चेहऱ्याला किती मार्क?’
‘किती देवू?’
‘यू डिसाइड….’
‘जास्त देता येणार नाहीत…’
‘का?’
‘शंभरपैकी जास्तीत जास्त शंभर मार्कच देता येतात.. त्याच्यापेक्षा जास्त देता येत नाहीत’
‘यु आर व्हेरी स्वीट डिअर’
‘बघ तुला तीनशे पैकी तीनशे मार्क पडले…. तू हुशार होतीस शाळेत, कॉलेजमध्ये… पण एवढे मार्क तिथंही पडले नसतील कधी…’
‘खरं आहे’
‘तुला बघितलं की काय वाटतं सांगू?’
‘काय वाटतं?’
‘वाटतं की….’
‘सांगा ना, काय?’
‘नको… तुला राग येईल’
‘बी फ्रॅंक डिअर… मला नाही राग येणार…’
‘प्रॉमिस?’
‘प्रॉमिस…’
‘कोणाला सांगणार नाहीस ना?’
‘ओह डिअर, यु आर किलिंग मी… सांगा ना…’
‘ओके…. तुला बघितलं की अस वाटतं की आपण एक बाहुलीच बघत आहोत….’
‘थॅंक्स…. आज मैं बहुत खुश हूं… मला माहीतच नव्हतं मी किती सुंदर आहे ते… यू एनलाइटनड मी’
‘अशीच खुश रहा… हसत रहा.. मग बघ तुला कसे पॉझीटीव्ह रिझल्ट्स मिळतात ते…’
‘थॅंक यू डिअर…’
‘उद्या भेट परत…. तुला आणखी कांही महत्वाचं सांगायचं आहे…’
‘आताच सांगा ना…’
‘नको. सध्या एवढंच पुरे… आज मी जे कांही सांगितले ते पक्कं लक्षात ठेव. स्वत:च्या चेह-यावर प्रेम करायाला शिक. सारखी आरशात बघत जा… तिथं तुला जगातला सर्वात सुंदर चेहरा दिसेल! तुझ्या एवढं सुंदर कुणीच नाही गं माझ्या बघण्यात….’
‘हाऊ स्वीट! पण माझी आजी पण सुंदर होती….’
‘सध्या तू तुझ्या आजीला विसर.. स्वत:च्या सौंदर्याचा विचार कर…’
‘यू आर व्हेरी लव्हली डिअर….’
‘किती वेळा डिअर म्हणतेस…. माझ्या प्रेमात नको पडू… स्वत:च्याच प्रेमात पड..’
‘ओके डिअर…’
‘जा आता… स्वप्नात देखील स्वत:लाच बघ… हॅव अ स्वीट नाईट…’
‘मी भेटेन… उद्या.. याच वेळी… गुड नाईट… बाय…’
‘गुड नाईट…’

या लघुकथेचा पुढचा भाग: गौरीचं लग्न

महावीर सांगलीकर हे सिनिअर
न्यूमरॉलॉजिस्ट, मेंटॉर, मोटिव्हेटर,
फेस रीडर आणि कथालेखक आहेत.

आणखी काही…..

Raigad | रायगडाला जेंव्हा जाग येते : रायगड परिक्रमा

महिलांची मानसिकता, स्वभाव आणि समस्या

जात धर्मापलीकडे जाण्यासाठी…..| Marriage

Marathi Story | गूढकथा: सलोनी राठोड

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

TheyWon English

Health Benefits of Black Tea

16 thoughts on “गौरी आणि फेस रीडर | Gauri

  1. समाज विचार बदलेल
    स्वतःवर प्रेम व अभिमान बाळगणे आवश्यक
    कथा भावली
    असेच काही स्पुर्थीदायक लिखाणाची अपेक्षा
    👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *