
महावीर सांगलीकर
दिशाची गोष्ट या दीर्घ कथेतील 10 वा भाग …. Marathi Story: 1857
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सायबर कॅफेत गेलो.
‘मग महावीरजी, कसे काय वाटले कालचे एप्रिल फुल?’ मी मेसेंजर ओपन करताच दिशाने विचारलं.
‘आय एन्जॉयड इट’, मी म्हणालो, ‘पण दिशा टाईमपास बास झाला आता. आता आपण कामाचे बोलू’
‘व्हाट डू यू मीन बाय ‘कामाचे’ बोलू? मी तसले कांही चॅट करणार नाही हं, सांगून ठेवते’
‘शट अप दिशा. निर्लज्ज कुठली… तुला माहीत आहे ना मला फालतूपणा आवडत नाही. तू तुझ्या मर्यादेत रहा, स्टुपिड गर्ल’
‘सॉरी सॉरी.. आय वाज जस्ट किडिंग’
‘नेव्हर क्रॉस द लाईन. मला नवल वाटते, अशी गोष्ट तुझ्या मनात आलीच कशी?’
‘सॉरी म्हटलं ना… यू शुड लर्न टू फॉरगिव्ह…’
‘ओके, यावेळी मी तुला माफ करत आहे, पण पुन्हा असे कांही बोललीस तर आय विल हर्ट यू. नो मॅटर व्हाट हॅपन्स टू मी… अंडरस्टुड?’
‘समजले… पण तुम्ही फारच ताणून धरता. एवढे नका ताणत जावू. तुमच्या डोक्याला ताप, माझ्याही डोक्याला ताप’
‘सॉरी दिशा. मी जरा जास्त चिडलो तुझ्यावर. पण लक्षात ठेव, तुझ्याबद्दल माझ्या मनात वेगळी प्रतिमा आहे. तिला तडा नको देवूस’
‘ओके बाब्बा… परत नाही असे होणार’
‘नाऊ इफ यु आर इंटरेस्टेड, अन्स्वेर द क्वेश्चन्स आय आस्क’
‘ओके सर, आय एम रेडी. यु कॅन आस्क व्हाटेव्हर यु वांट टू आस्क’
‘रिलॅक्स. आत्ता जे झाले ते सगळे पूर्ण विसरून जा’
‘हो..’
Marathi Story: 1857
मग मी तिला प्रश्न विचारायला सुरवात केली.
‘दिशा मला सांग, 1858 मध्ये काय घडले? त्या काळात तू उत्तर भारतातल्या एका संस्थानिकाची मुलगी होतीस ना?’
‘कमाल आहे… हे तुम्हाला कसे काय माहीत? तुम्हाला तो जन्म आठवतो वाटतं?’
‘मला कांहीच आठवत नाही…’
‘मग मी त्यावेळी एका संस्थानिकाची मुलगी होते हे तुम्हाला कसे कळले?’
‘अंदाज… तुझ्या एवढ्या जन्मांपैकी एखादा जन्म त्या काळातला असणार, आणि 1857च्या बंडात तुझा कांहीतरी सहभाग असणार..
मग तिने तिच्या त्या जन्माची कहाणी सांगायला सुरवात केली.
‘उत्तर प्रदेशातल्या एका छोट्या संस्थानात माझा जन्म झाला होता. माझे सुरवातीचे शिक्षण राजवाड्यातच झाले. नंतर एका इंग्रज अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार राजेसाहेबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मला पुढच्या शिक्षणासाठी विलायतेला पाठवले…….’
‘शिक्षणाच्या काळात मला इंग्लंड आणि इतर देशांची जवळून ओळख झाली. त्यांनी केलेली भौतिक प्रगती पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांची शिक्षणव्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रशासन, सैन्य व्यवस्था यांचे कौतुक वाटले. भारतात परत गेल्यावर आपल्या संस्थानाला इंग्लंडसारखे बनवायचे असे मी इंग्लंड मध्ये असतानाच ठरवले होते. 1855 साली मी भारतात आल्यावर कांही महिन्यातच आमच्या संस्थानात मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. संस्थानातली मुलींची पहिली शाळा 1830 सालीच झाली होती. ती इस्ट इंडिया कंपनीने सुरू केली होती…’
Marathi Story: 1857
1857 साली इस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात कांही संस्थानांनी बंड सुरू केले. राजेसाहेबांचे धोरण या बाबतीत तटस्थ रहाण्याचे होते. त्यावेळी माझे वय 25 वर्षे होते. माझे लग्न शेजारच्या संस्थानातील राजकुमार समर सिंग याच्याशी ठरले होते. तो अचानक या बंडात सामील झाला. त्याने राजेसाहेबांना निरोप पाठवून त्यांनीही बंडात भाग घ्यावा असे सुचवले. पण राजेसाहेबांनी त्याला नकार दिला. मग तो स्वत: राजेसाहेबांना भेटायला आला, पण राजेसाहेबांचा नकार कायम. नंतर तो मला भेटला. मी माझी भूमिका स्पष्ट केली. हे बंड अपयशी ठरणार आहे, त्यामुळे तूही या बंडातून अंग काढून घे, उलट इंग्रजांना सामील हो असा मी त्याला सल्ला दिला. तो रागाने निघून गेला.
या घटनेनंतर कांही दिवसातच राजेसाहेब वारले. राज्याला पुरुष वारस नव्हता, त्यामुळे इंग्रजांनी आमचे संस्थान खालसा करायचे ठरवले. मला या गोष्टीचा धक्का बसला. मी बंडात सामील व्हायचे ठरवले. त्याची चाहूल लागताच इंग्रजांनी आमच्या संस्थानावर हल्ला करायचे ठरवले. त्यांचे सैन्य आमच्या सीमेवर जमा झाले. आमचे सैन्यही सज्ज झाले. युद्ध सुरू झाले. अचानक राजकुमार समरसिंगाचे सैन्य आले आणि त्याने इंग्रज सैन्यावर पाठीमागून हल्ला सुरू केला. त्यामुळे इंग्रजांचे सैन्य दोन्ही बाजूने कचाट्यात सापडले आणि इंग्रजांचा पराभव झाला.

Marathi Story: 1857
पुढे 1858 च्या जानेवारीत बंडखोरांच्यापैकी कांही जणांनी समरसिंगाशी दगाबाजी केली आणि त्याला पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्याच काळात इंग्रजांनी आमच्या संस्थानावर परत हल्ला केला. आम्ही लढलो, पण आमचा पराभव झाला. त्यावेळी आमच्या महामंत्र्याने मला पळून जावून नेपाळमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला दिला. ‘जान है तो जहान है’ या विचाराने मी तो सल्ला मानला. पण पळून जात असताना माझ्याशीही दगाबाजी झाली आणि इंग्रजांनी मला अटक केली. मला नजरकैदेत ठेवण्यात आले.
1858च्या मार्च महिन्यात इंग्रजांनी समर सिंगाला तोफेच्या तोंडी दिले. त्याच्या पुढच्याच आठवड्यात माझ्या हातून एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून झाला. मी पुन्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना इंग्रजांच्या गोळ्यांना बळी पडले’
तिची ही कहाणी ऐकून मला विशेष कांही वाटले नाही. तिला आणखी कांही प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता, कारण कांहीही विचारले तरी तिच्याकडे उत्तरे तयार असणार हे मला माहित्त होते. मी तिला म्हणालो,
‘दिशा, आजपर्यंत तू जे कांही सांगितलेस त्यावरून मी कांही निष्कर्ष काढले आहेत. मी उद्या तुझ्या जन्मांचे विश्लेषण तुला सांगणार आहे. त्यातून कांहीतरी सोल्यूशन काढता येईल आपल्याला’.
‘सगळं ठीक आहे ना? कांही प्रॉब्लेम नाही ना?’ दिशाने विचारले.
‘सगळं ठीक आहे. काळजी करण्यासारखं कांही नाही’
‘थॅंक गॉड’
‘थॅंक गॉड काय, थॅंक यू महावीरजी म्हण की…’
‘ते उद्या म्हणेन… हा हा..’
पुढे चालू …
दिशाची गोष्ट या दीर्घकथेचे आधीचे भाग ….
1 पत्रमैत्रिण | 2 पत्रमैत्रिण (भाग 2) | 3 दिशाची पुन्हा एन्ट्री |
4 दिशा विविध भारतीवर | 5 दिशाच्या वागण्यामागील रहस्य | 6 राजकुमारी निर्भया |
7 राणी निर्भयाचे संघर्षमय जीवन | 8 दिशाचं वेगळं रूप | 9 अनबिलिव्हेबल दिशा….. |
आणखी मराठी कथा ….
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!