मराठी कथा: आस,सगळ्यांसाठी असते खास (1)

बारीश

Marathi Short Story Aas part 1
मराठी कथा: आस,सगळ्यांसाठी असते खास (1)

काव्या दोन दिवसांपासून बेचैन होती. ह्या बेचैनीमुळेचती काल रात्र भर निवांत झोपू ही शकली नव्हती. आज वेळेआधीच जागही आली. मनाला थोडे हलके वाटावे म्हणून बाल्कनीमध्ये जाऊन स्वच्छ हवा घेत तिथेच उभी राहिली. तिच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीमधून सुन्दर दृश्य हवा, आकाश नि पूर्वेकडे सूर्योदयाच्या आधीची रक्तीम लाली पसरलेली ती बघत राहिली. नंतर नजर रस्त्यावर…

रस्त्यावरची पहाटेची थोडी फार शहरी हालचाल चालु होती. दूधवाले, मॉर्निंग वॉकवाले, फर्स्ट शिफ्टवाले, फुल पुडावाले असे बरेचजण…. पण सगळे आप आपल्या व्यापात. हा व्यापच तर सगळ्यांना पायाला चाकं लावून पळवतो.

पण आज मी का अशी ह्या सर्वांपासून वेगळी वाटत आहे? मलाही किती व्याप आहेत. घरची मोजकीच पण ठरलेली कामे.. योगा… ऑफिस… ह्या सर्वात नवऱ्याला सांगूनही त्याने विसरलेली कामे ही असतातच. दिवस पुरत नाही कधी कधी. लग्नानंतर मी एवढी कामे करेन असे कधी वाटले ही न्हवते.

परवाच सहा वर्ष पूर्ण झाली संसाराला. तिचा आणि विशालचा गोड संसार. सगळीकडून अगदी दृष्ट लागावा असा. दोघेही मेड फॉर इच ऑदरवाले कपल. विशाल नावाप्रमाणेच मोठ्या मनाचा, टिपिकल पुरुषप्रधान किंवा शिकून ही मागासलेल्या विचारांचा न्हवता. नेहेमी हसतमुख स्वतःला ही नि बरोबर असणाऱ्यांनाही हसत ठेवणारा. घरात शक्य होईल ती मदत करणारा. नेहेमी बरोबरीने वागवणारा असा विशाल. काव्याच्या मैत्रिणी नेहेमी तिला ह्या बाबतीत नशीबवान आहेस असे म्हणायच्या.

Marathi Short Story Aas part 1

एवढे सगळे सुचारु रूपाने चालू होते. पण…. हल्ली एक ‘पण’ तिच्या आयुष्यात डोकावत होता. तो पण पाळण्याचा होता. हो लग्नाला सातवे वर्ष लागूनही घरी पाळणा हलला नव्हता. सुरुवातीच्या वर्षात दोघांच्या सहमतीने त्यांनी काही वर्षे अपत्य होऊ दिले नव्हते. नवीन संसार, गावाकडील जबाबदाऱ्या… दोघांच्याही ऑफिस मधले सुरुवातीचे कामाचे दिवस. त्यात नवीन फ्लॅट…., ह्या सगळ्यात अपत्याचा विचार त्यांनी पुढे ढकलला होता.

तीन चार वर्षात थोडी स्थिरता येऊ लागल्यानंतर त्यांनाही आता छोट्या जीवाचे वेध लागू लागले होते. दोघेही तसे आरोग्य पूर्ण जीवन जगत होते. कोणता आजार किंवा आनुवंशिकही काही न्हवते. त्यामुळे दोघेही रिलॅक्स होते. होईल पुढच्या काही महिन्यातअसे दर महिन्यात त्यांना वाटत होते. त्यात विशाल हॅपी गो लकी परसन. तो काव्या बरोबर खुष असायचा, पण हल्ली तिची नाराजी बघून बघून तिला नेहेमी म्हणायचा,

जिंदगी तो है आतिश ए आफताब
ये कोई पढने की नही किताब
जो बुरा लगे वह पन्ना न फाड़ सकोगे
और न जो अच्छा लगे ओ ज्यादा जोड़ लोगे
डट के काटना होगा ये सफर
नही तो कोई नही करेगा तेरी कदर
राहे तो नही बदलेंगी तुम्हारे वास्ते
बदलने तो तुम्हे ही होंगे रास्ते
बनो अच्छा बटोही
जीत सकोगे जीवन की लड़ाई ….

तिला असे काही ऐकून तेवढ्या पुरते तरी बरे वाटायचे. पण विशालला ही आतून काही तरी वेगळे वाटू लागले होते. आता ह्या वाटण्यालाही कुठे तरी शंका येऊ लागली होती. म्हणून दोघेही तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास गेले होते. काही जुजबी टेस्ट करून त्यांनी परत बोलावले. सुरुवातीचे तर सगळे टेस्ट नॉर्मलच होते. सो वेट एन वॉच स्थिती.

Marathi Short Story Aas part 1

पण काव्याला काही अलीकडे कशात लक्ष लागत नव्हते. ऑफिसमध्ये थोडी ती कामाच्या व्यापात ही गोष्ट विसरायची पण घरी आले की परत ते विचार तिचा पीच्छा सोडत नसत.

आजच्या दिवसाच्या बेचैनीचे कारण तिचा एक मेडिकल रिपोर्ट येणार होता. त्या वरून काही गोष्टी स्पष्ट होणार होत्या. त्यामुळे ती बेचैन होती. मनात पाल चूकचुकत होती. त्यात रेडिओ वरील काही ओळी तिच्या कानी आल्या…..

ऊसर भूमि है तू
तुझे न हक़ बादल बरिशों से प्यार का
उनका न राबता किसीसे
ओ कभी खेद ही नही करेगा तेरे बांझ होने से
उसको कुछ लगता ही नही तुझे खो देने से
तेरा कल्लर होना तुझे ही होगा ढोना….

मन अजून च खिन्न झाले तिचे. नारी जन्म…. असे उसासा टाकून ती म्हणाली नि आत निघून गेली.

पुढचा भाग…. आस….. भाग 2

इतर काही मराठी लघुकथा

सिंगल मदर

लव्ह जिहाद

अनबिलिव्हेबल दिशा…..

रहस्यकथा: दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी

TheyWon English (Online Magazine)

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

4 thoughts on “मराठी कथा: आस,सगळ्यांसाठी असते खास (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *